Rashmi Thackeray-Aaditya Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Leader Secret Blast : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा रश्मी ठाकरेंचा आग्रह होता; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट

Vijaykumar Dudhale

Sangli, 21 May : अजित पवार, सुनील तटकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध होता, हा संजय राऊत यांचा आरोप साफ खोटा आहे. मात्र, रश्मी ठाकरे यांच्याअ हट्टामुळे आदित्य ठाकरे यांचेच नाव सुरुवातीला मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. ते शक्य नसल्याचे लक्षात येताच संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी 2004 मध्ये अजित पवार मुख्यमंत्रिपदासाठी अनुभवी व सक्षम नव्हते, त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री केले नाही. छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते, तर त्याचवेळी पक्ष फुटला असता, असा दावा केला होता. त्याला उमेश पाटील (Umesh Patil) यांनी सविस्तर उत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खरं तर शरद पवार यांचे लेकीवरील प्रेम आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र प्रेम यामुळेच हे दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले. पुढील अडीच वर्षे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मुख्यमंत्री करण्याचे डील काँग्रेस पक्षापासूनही लपवून ठेवले होते, असा दावा उमेश पाटील यांनी केला.

मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार हे 2004 मध्ये सक्षम नव्हते, हे केवळ कारण सांगितले जाते. वास्तविक पक्षाचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्याचे स्वप्न तेव्हापासूनच होते. त्यात अडथळा नको आणि समांतर नेतृत्व तयार होऊ नये, यासाठी पक्षाने त्या वेळी मुख्यमंत्रिपद घेण्याचे टाळले आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

उमेश पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षासोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचे 2019 मध्ये ठरले होते. त्याला पक्षाच्या सर्व आमदार आणि नेत्यांची संमती होती. पवारांच्या सूचनेनुसार सर्व बोलणी सुरू होती. मात्र, त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय ऐन वेळी बदलला. कारण, शिवसेनेसोबत जाऊन अडीच वर्षे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्र करण्याचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठरले होते. त्यावेळी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी सर्व आमदारांनी एकमुखाने केली होती. त्यामुळे पहाटेचा शपथविधी मोडून अजित पवार पुन्हा महाविकास आघाडीसोबत आले होते. आमदारांच्या आग्रहामुळे त्यांना उपमुख्यमंत्री करावे लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT