Madha Lok Sabha Victory : माढ्यातून मोहिते पाटलांच्या विजयावर चक्क 11 बुलेटची पैज!

Bet Of 11 Bullet : शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून माढा तालुक्यातील बावी येथील नीलेश पाटील या शेतकऱ्याने मोहिते पाटील यांच्या विजयाचा दावा करत त्यांच्यावर तब्बल 11 बुलेटची पैज लावली आहे.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 May : महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागांसाठी मतदान पूर्ण झाले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार, यावर पैजा लागल्या आहेत. सर्वाधिक चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील हे जिंकतील, असे सांगून त्यांच्यावर तब्बल 11 बुलेटची पैज लावली आहे. हा पैजाचा विडा ठेवून तीन दिवस झाले तरी विरोधी भाजपकडून तो कोणीही अद्याप स्वीकारलेला नाही, त्यामुळे मोहिते पाटील यांच्या विजयाचा दावा केला जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी (Madha Lok Sabha Constituency) तिसऱ्या टप्प्यात 7 जून रोजी चुरशीने मतदान झाले. मतदानानंतर सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाचा दावा केला जात आहे. सोलापूरमध्ये मनसे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून (NCP) अनुक्रमे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे जिंकणार असा दावा केला जात आहे. मनसेने एक लाख रुपयांचा ठेवलेला पैजेचा विडा राष्ट्रवादीकडून उचलण्यात आलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातही पैजे विडे ठेवले जाऊ लागले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mohite Patil
Kolhe-Adhalrao's Victory Flex : निकालाआधीच आढळराव-कोल्हेंच्या विजयाचे फ्लेक्स झळकले!

माढा लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत सहानुभूतीचे वातावरण होते, त्यामुळे माढ्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण दिसून आले होते. तसेच, शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून माढा तालुक्यातील बावी येथील नीलेश पाटील या शेतकऱ्याने मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्या विजयाचा दावा करत त्यांच्यावर तब्बल 11 बुलेटची पैज लावली आहे.

माढ्यातील नीलेश पाटील यांच्याकडे सहा एकर द्राक्ष बाग आहे. फळबागांसाठी शरद पवार यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीची जाणीव पाटील यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवलेले मोहिते पाटील निवडून येणार, असा दावा पाटील यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी चक्क 11 बुलेटची पैज लावली आहे.

दरम्यान, पुढचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले तर ज्यांनी पैज लावली आहे, त्याला बुलेट देण्यात येईल. जर तुतारीचा उमेदवार निवडणून आला तर त्यांनी पाटील यांना बुलेट द्यायची, अशी ती पैज आहे.

Dhairyasheel Mohite Patil
Governor in Mahabaleshwar : राज्यपाल बैस आजपासून महाबळेश्वर मुक्कामी; लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

नीलेश पाटील यांनी ही पैज जाहीर करून तीन दिवस झाले तरी अजूनही विरोधी उमेदवारांकडून कोणीही ती पैज स्वीकारलेली नाही. येत्या चार जूनला लोकसभेचा निकाल आहे, तत्पूर्वी तीन जूनपर्यंत कोणीही यावे आणि अकरा बुलेटची शर्यती लावावी, असे आवाहन पाटील यांनी दिले आहे. आता हा अकरा बुलेटच्या पैजेचा विडा कोण उचलेल, याकडे माढ्याचे लक्ष लागले आहे.

Dhairyasheel Mohite Patil
Bhujbal Vote to Shivsena : बाळासाहेबांना चॅलेंज करणाऱ्या भुजबळांनी 34 वर्षांनंतर उमटवली धनुष्यबाणावर मोहोर...!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com