Maharashtra CM : 'ग्रामपंचायतही न लढलेले उद्धव ठाकरे पवारांना मुख्यमंंत्रिपदासाठी सक्षम कसे वाटले?'

Pawar Vs Pawar : महाविकास आघाडीमध्ये पहिली अडीच वर्षे शिवसेनेला, तर पुढची अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद ठरले होते. हा फॉर्म्युला गुप्त होता. नैसर्गिक न्यायाने एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदावर दावा होता.
Sharad Pawar-Uddhav Thackeray-Supriya sule-Chhagan Bhujbal-Ajit Pawar
Sharad Pawar-Uddhav Thackeray-Supriya sule-Chhagan Bhujbal-Ajit PawarSarkarnama

Sangli, 21 May : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा नव्हता. तेव्हा छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते तर तेव्हाच पक्ष फुटला असता असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत केले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मंत्रिपदाचा अनुभव असलेले मातब्बर नेते मुख्यमंत्रिपदासाठी लायक नव्हते, तर ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कधी लढवली होती, ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम आणि अनुभवी कसे वाटले, असा सवाल पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) 2004 मध्ये अजित पवार, डॉ. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ, मधुकरराव पिचड, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे या सारखे मंत्रिपदाचा अनुभव असलेले मातब्बर नेते होते. ते पवारांना (Sharad Pawar) मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम वाटते नव्हते, असेही उपरोधिकपणे उमेश पाटील यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Uddhav Thackeray-Supriya sule-Chhagan Bhujbal-Ajit Pawar
Lok Sabha Election 2024 : सोलापुरात निवडणूक खर्चात भाजप आघाडीवर; सातपुतेंचा सर्वाधिक 84 लाख, मोहिते पाटलांचा सर्वांत कमी 51 लाख

पाटील म्हणाले, खरं तर भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंंत्रिपद मिळणार नव्हते. त्यामुळे पवारांनी भाजपसोबत न जाता शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण, महाविकास आघाडीमध्ये पहिली अडीच वर्षे शिवसेनेला, तर पुढची अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद ठरले होते. हा फॉर्म्युला गुप्त होता. नैसर्गिक न्यायाने एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदावर दावा होता. अनेक आमदारांचे समर्थनही त्यांना होते. पण सुप्रिया सुळे यांना पुढची अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे नाव पहिल्या अडीच वर्षासाठी जाहीर करावे, असा प्रस्ताव संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मांडला. त्यानंतर पुढीच पाच वर्षे स्वतः उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील, असे सांगण्यात आले होते.

पुढील अडीच वर्षांसाठी सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केले असते तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून समर्थन मिळालं नसतं. कदाचित त्याचवेळी पक्ष फुटला असता, त्यामुळेच हे शिवसेनेनेसोबतचे डील गुप्त ठेवले होते. विशेष म्हणजे हा फॉर्म्युला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माहिती होता. त्यामुळे पवारांनी भाजपसोबत न जाता संसदीय कामाचा कोणताही अनुभव नसलेला नेता पवारांनी मुख्यमंत्रिपदी लादला, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

लेकीच्या प्रेमापोटीच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांना शरद पवार यांनी 2004 पासून डावलेले आहे. मात्र, त्या मुळे पक्षाचे सर्वांत मोठे नुकसान झाले आहे. पक्ष उभारणीत आपल्या आयुष्याचे योगदान देणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, आर. आर. पाटील, जयंत पाटील, मधुकर पिचड, दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार असणारे तत्कालीन नेत्यांवर पवारांनी अन्यायच केला आहे, असेही उमेश पाटील यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar-Uddhav Thackeray-Supriya sule-Chhagan Bhujbal-Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar : जे सोडून गेले त्यांच्याबाबत आमचं ठरलंय...; अनिल देशमुखांनी एकदम स्पष्टच केलंय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com