Rashtriya Samaj Party Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : सांगली लोकसभेच्या आखाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाची उडी

Rashtriya Samaj Party News : स्वबळाचा नारा देत उमेदवारी केली जाहीर अन् प्रचारालाही सुरुवात

सरकारनामा ब्यूरो

Sangli Loksabha Election : सांगली लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाने देखील आता उडी घेतली आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कालिदास गाढवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याची निर्धार करत प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली आहे.

सांगली लोकसभा मतदार संघात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आता महायुतीचे घटक पक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कालिदास गाढवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.कालिदास गाढवे हे उच्चशिक्षित तरुण आहेत.नुकतेच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील दिली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार म्हणून कालिदास गाढवे यांची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे कालिदास गाढवे यांनी लोकसभा निवडणुक लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे, यासाठी आता सांगली लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपर्क अभियान देखील सुरू करण्यात आले आहे.

माजीमंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा निवडणूक लढवण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा विश्वास यावेळी कालिदास गाढवे यांनी व्यक्त केला आहे.

(Edityed by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT