Tasgaon Assembly Constituency : तासगावात दोन ज्युनिअर पाटील भिडणार ; संघर्षाचा वारसा रोहित आणि प्रभाकर यांच्यात...

Prabhakar Patil Vs Rohit Patil : तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी.
Prabhakar Patil, Rohit Patil
Prabhakar Patil, Rohit PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात दिवंगत उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील (आबा) आणि विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचा संघर्ष संपूर्ण राज्याने पहिला आहे. मात्र आता तोच संघर्षाचा वारसा पुढच्या पिढीकडे अर्थात दोन ज्युनियर पाटलांमध्ये देखील पहायला मिळत आहे. त्यासाठी दोघेही मैदानात उतरले आहेत. (Tasgaon Assembly Constituency)

आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित आणि संजयकाकांचे पुत्र प्रभाकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन्ही युवा नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवत असल्याचे चित्र दिसत आहे. यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. प्रथम लोकसभेच्या निवडणुका होतील. तत्पूर्वी तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात आता विधानसभा निवडणुकीसाठी टशन सुरू झाले आहे.

Prabhakar Patil, Rohit Patil
Maharasta politics : ठाकरेंचा 'बाण' गेला, पवारांचे 'घड्याळ'; महाराष्ट्राची निवडणूक असणार सर्वार्थाने वेगळी

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी राजकारणात चांगला नावलौकिक मिळवला असला तरी त्यांना मतदारसंघात मोठा संघर्ष करायला लागायचा. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष झाला होता. आबांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना 2016 च्या विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात आली. त्यानंतर 2019 ला त्यांनाच पुन्हा संधी मिळाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र आता 2024 ला त्यांचे पुत्र रोहित पाटील हे विधानसभेची निवडणूक लढतील, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हा संघर्ष आता पुढे जाताना दिसू लागला आहे. खासदार संजय पाटील कृष्णा खोरे विकास महामंडळावर असल्यापासून सिंचन योजनांसाठी पाठपुरावा करीत होते, आता रोहित पाटील यांनी टेंभू योजनेसाठी उपोषण करून सरकारला कोंडीत पकडून योजनेला मंजुरी मिळवली.

दरम्यान खासदार पाटील यांनी स्वतःच्या मुलासाठी आईची धडपड सुरू असल्याचा आरोप केला होता. आता प्रभाकर पाटील आणि रोहित पाटील हे देखील एकमेकांवर राजकीय पलटवार करीत आहेत. प्रभाकर पाटील यांनी रोज संपर्कदौरा सुरू केला आहे. खासदार फंड व शासनाच्या विविध योजनांमधून ठेकेदारांना काम देणे, लोकांची कामे करणे, स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक सभेत प्रभाकर पाटील हे रोहित पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत.

रोहित पाटील यांची कर्तव्य यात्रा...

निवडणुकांचा अंदाज घेऊन रोहित पाटील यांनी देखील आता तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात 'कर्तव्य यात्रा' काढून मतदारांचा संपर्क वाढवला आहे. रोज एका गावात जाऊन तिथे लोकांना भेटणे, लोकांचे प्रश्न समजून घेणे, एखाद्या गावात मुक्काम करणे, अशी ही यात्रा निघाली आहे. याच यात्रेतून निवडणुकीची साखरपेरणी सुरू झाली आहे.

खासदार गटाकडून प्रभाकर उजळणार ?

खासदार गटाकडून आता संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हेच भाजपकडून आगामी विधानसभा निवडणूक लढतील, असे जाहीर करून गेल्या दीड - दोन वर्षात तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार संपर्क वाढवला आहे. समाजमाध्यमात देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे आजपर्यंत राजकारणापासून लांब राहिलेले प्रभाकर हे उजळणार असल्याचे दिसत आहे.

(Edited by Amol Sutar)

Prabhakar Patil, Rohit Patil
Uddhav Thackeray: भाजपचा बडा मासा ठाकरे गटाच्या गळाला; आज मेगा भरती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com