Ravikiran Ingwale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ravikiran Ingwale News : 'त्री देव नव्हे, थ्री..', म्हणत कोल्हापुरात ठाकरे गटाच्या नेत्याने 'महायुती'च्या बॅनरवर साधला निशाणा!

Ravikiran Ingwale On Rajesh Kshirsagar : जीवाचा आटापीटा करुन आम्ही हिंदुत्वादी असा हंबरडा फोडणारे हे सरकार स्वतःला आाता देव समजू लागलेत का? असा सवाल करत राजेश क्षीरसागर यांनाही टोला लगावला.

Mayur Ratnaparkhe

Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहरभरात महायुतीच्या नेत्यांचे 'त्रिदेव अजिंक्य' असा उल्लेख करून शहरभर बॅनर लावले आहेत. ज्यावर ठाकरे गटाने टीका केली आहे.

महायुतीच्या या बॅनरची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले(Ravikiran Ingwale) यांनी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी पत्रक काढत त्यांनी या फलकबाजीवर टीका केली आहे.

रविकिरण इंगवले यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'कोल्हापूर शहरातील स्वयंमघोषित धर्मवीर महाशयांनी कोल्हापूर शहरामध्ये ठिकठिकाणी "त्रिदेव अजिंक्य" नावाचे डिजिटल फलक लावले आहेत. डिजिटल फलक लावण्यास आमचा विरोध नाही. पण 'त्रिदेव' ही संकल्पना हिंदूना योग्य वाटली का?' असा सवाल इंगवले यांनी केला आहे.

याशिवाय 'हिंदू धर्मामध्ये "त्रिदेव' म्हणजे ब्रम्हा-विष्णु -महेश यांना त्रिदेव किंवा श्री गुरुदेव दत्त संबोधले जाते. पण या बेगड्या हिंदुत्ववादी सरकारच्या पदाधिकाऱ्याने देवांचे नाव किंवा देव ही संकल्पना चक्क नेत्यानांच बहाल केली. जीवाचा आटापीटा करुन आम्ही हिंदुत्वादी असा हंबरडा फोडणारे हे सरकार स्वतःला आाता देव समजू लागलेत का?' अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर(Rajesh Kshirsagar) यांचे नाव न घेता रविकिरण इंगवले यांनी केली आहे.

याचबरोबर 'सत्तेचा व पैशाचा माज यातुनच सिध्द होतो. रावणालाही त्रिलोक विजयी वाटत होते. पण त्याचा अहंकार प्रभु श्रीराम व वानरसेनेने जाळून भस्मात केला, स्वयंमघोषित धर्मवीराने हिंदूंची देव ही संकल्पना नेत्यांना बहाल केल्यामुळे, हिंदूंच्या देव या व्याख्येची विटंबना झालू. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देव नेमके कोण हे 'या' त्रिदेवांना हिंदुत्ववादी जनताच दाखवेलं.', असा इशारा इंगवले यांनी दिला आहे.

(Edited by - mayur ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT