Shiv Sena Politics : राजेश क्षीरसागर-अंबादास दानवे संघर्ष वाढला; "सावकारीला पाठबळ देणाऱ्या..."

Kolhapur Political News : "मागच्या दरवाजाने आमदार होऊन विरोधी पक्षनेते बनले आहेत..."
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : खासगी सावकारी विरोधात सर्वसामान्य कुटुंबीयांना न्याय मिळवून देताना राजकीय बदनामीपोटी आखण्यात आलेल्या षडयंत्राला विरोधी पक्ष पाठीशी घालत असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. बदनामी करण्यासाठी एका विरोधी पक्षनेत्याला खासगी सावकाराच्या बाजूने उभे राहून पोलिस प्रशासनाला धारेवर धरावे लागते, हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच घडलेली गोष्ट आहे. म्हणजेच विरोधी पक्षनेते काँग्रेसप्रणित खासगी सावकारीला पाठबळ देत आहेत, असा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Politics
NCP Crisis News : फसवून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले; अशोक पवार अन् कोल्हेंचा अजित पवारांवर आरोप!

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापुरात येऊन आज गरळ ओकली. एखाद्या लोकप्रतिनिधीचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यापर्यंत त्यांची मजल गेली, यावरून त्यांच्या संस्काराचे दर्शन होते. दानवे हे जनतेतून निवडून न येता मागच्या दरवाजाने आमदार होऊन विरोधी पक्षनेते बनले आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण नाही. राजकीय हेतूने अंबादास दानवे यांनी केलेल्या स्टंटबाजीस छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन उत्तर देऊ, असे आव्हान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी घरात मारहाण केलेल्या वरपे कुटुंबीयांची आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घरी जाऊन भेट घेतली. प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि शिवसेनेतील दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यामुळे कोल्हापूर शहरातील राजेश क्षीरसागर यांच्या घरासमोरील वातावरण तणावपूर्ण बनले होते. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये, यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती.

Kolhapur Politics
NCP News : अजितदादांच्या नावाची कोनशिला फोडली; 'राष्ट्रवादी'च्या दोन्ही गटांतील समर्थक भिडले

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी, वरपे कुटुंबीयांची भेट घेत माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख यांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले. (Latest Political News)

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com