Narendra Modi, Udayanraje Bhosale, Ranjitsinh Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation News : आरक्षणप्रश्नी उदयनराजे, रणजितसिंहांचा मास्टर स्ट्रोक; थेट मोदींनाच साकडे

Umesh Bambare-Patil

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावे. यासोबतच धनगर समाजाच्या मागणीनुसार त्यांचे आरक्षण बदलून द्यावे, अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व पक्षिय खासदारांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. या बैठकीनंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यानी मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. त्यानुसार खासदार निंबाळकर यांच्यासमवेत खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी पंतप्रधान मोदी Narendra Modi यांची भेट घेतली.

यावेळी महाराष्ट्रातील आरक्षण प्रश्नावर दोन्ही खासदारांनी श्री. मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ओबीसी समाजाच्या आरक्ष्णाला धक्का न लावता मराठज्ञ समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका दोन्ही खासदारांनी मांडली. महाराष्ट्रातील मराठा समाजाने देशासाठीबलिदान दिले आहे. सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन समाज म्हणून मराठज्ञ समाजाची ओळख आहे.

मात्र, या समाजातील मुलामुलींची व कुटुंबांची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. शिक्षणाची फी भरणे ही या समाजातील मुलामुलींना अवघड झाले आहे. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीची श्वाश्वती नाही. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती दोन्ही खासदारांनी केली.

तसेच धनगर समाजाला अनुसूचित जातीमधून आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी हा समाज अनेक वर्षे झटत आहे. इतर राज्यात धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे. मात्र, महाराष्ट्रात धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही. तरी आपण यामध्ये लक्ष घालावे व समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणीही या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे केली.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT