PM Narendra Modi : काही म्हातारे, आजारी नेते भाजपला हरवण्यासाठी सक्रिय!

India Alliance : इंडिया आघाडीतील नेत्यांवर मोदींची टीका...
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

BJP Meeting News : भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीमध्ये देशभरातील अनेक पक्ष एकत्रित आले आहे. या आघाडीचीही आज महत्वपूर्ण बैठक होत आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी संसदीय दलाच्या बैठकीत विरोधकांवर जोरदार टीका केली.

विरोधी पक्ष 2024 मध्येही सत्तेबाहेर राहणार असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, विरोधकांकडून ज्याप्रकारे नकारात्मक राजकारण (Politics) केले जात आहे, त्यामुळे ते 2024 मध्येही सत्तेपासून दूरच राहणार आहेत. काही लोकांच्या नशिबातच चांगले आणि सकारात्मक काम करण्याचे लिहिलेले नसते. काही म्हातारे आणि आजारी नेतेही भाजपला (BJP) हटवण्याच्या नावाखाली सक्रीय झाले आहेत, असा टोलाही मोदींनी लगावला. याबाबतचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी कुणाला उद्देशून हा टोला लगावला यावरून आता चर्चांना उधाण आले आहे.

PM Narendra Modi
Gyanvapi Case : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुस्लीम पक्षकारांच्या सर्व याचिका फेटाळल्या

लोकसभा घुसखोरी प्रकरणानंतर विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनात गोंधळ घातल्याने कामकाज होऊ शकलेले नाही. आतापर्यंत 92 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यावरही पंतप्रधानांनी भाष्य केले. लोकशाहीवर विश्वास असलेल्या प्रत्येकाने संसदेतील सुरक्षेतील त्रुटीच्या घटनेची एकत्रितपणे निंदा करायला हवी. काही पक्ष त्याचे समर्थन करत असून हे घुसखोरीएवढेच धोकादायक आहे, असे मोदी यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे विरोधक सैरभैर झाले आहे. निराशेतून ते संसदेच्या कामकाजात अडथळे आणत आहेत. आपले सरकार पाडण्याचे इंडिया आघाडीचे उद्दिष्ट आहे. आणि आमच्या सरकारचे ध्येय हे देशाचे भविष्य उज्ज्वल करणे आहे. विरोधी पक्षांची वागणूकीमुळे २०२४ मध्ये भाजपचे संख्याबळ आणखी वाढेल, असे सुचक विधानही पंतप्रधानांनी बैठकीत केले.

PM Narendra Modi
MLA Santosh Bangar : आमदार बांगरांच्या चांगुलपणावर त्यांचे वादग्रस्त वागणे वरचढ

92 खासदार निलंबित

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेतील 92 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही सभागृहातील प्रत्येक 46 सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. सोमवारी एकाच दिवसात 74 खासदारांचे निलंबन करण्यात आले. मागील काही वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदारांचे निलंबन झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे. याबाबत आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.

(Edited By - Rajanand More)

PM Narendra Modi
Parliament Security Breach : संसद घुसखोर आरोपीच्या घरी पोलिस, आई-वडील-भावाची कसून चौकशी; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com