Dhairyasheel kadam-Shivendra raje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Dcc Bank : सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : भाजपकडून जागावाटपाचे सूत्र ठरविण्याची ‘या’ दोघांवर जबाबदारी

Shivendrasinhraje Bhosale- Dhairyashil Kadam : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून लढवणार आहेत. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप बाकी असून ११ ऑक्टोबरला महत्त्वपूर्ण तोडगा निघण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 09 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढविणार हे आता निश्चित झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून जागावाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र, अजूनही अंतिम तोडगा निघू शकलेला नाही.

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार धैर्यशील कदम यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यासोबत चर्चा केल्याची माहिती असून येत्या रविवारी (ता. ११ ऑक्टोबर) जागावाटपावर महत्वपूर्ण तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून सोसायटीच्या ११ जागा वगळून उर्वरित १० जागांचे वाटप होणार आहे. त्यात ठरावाच्या प्रमाणात जागा वाटप होणार आहे. तीनही पक्षांच्या ठरावात फारसा फरक नसल्याने याबाबतचा निर्णय लवकर होऊन तो सर्वांना मान्य होईल, अशी अपेक्षाही भोसले यांनी व्यक्त केली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत कोणाला किती जागा, याबाबत अद्याप बोलणी झालेली नाहीत. सध्या महायुतीमध्ये मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार धैर्यशील कदम यांच्याकडे सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी आहे, त्यानुसार त्यांनी ‘वन टू वन’ सर्वांशी चर्चा केली आहे.

मंत्री भोसले म्हणाले, जिल्हा बॅंकेत राजकारण नको, सर्वांनी एकत्र चर्चा करून निर्णय घ्यायचे ठरले आहे. मी दोन दिवस गुजरातमध्ये होतो, तसेच मंत्री मकरंद पाटीलही बाहेर होते. त्यामुळे जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी येत्या रविवारी महायुतीतील सर्व नेत्यांशी चर्चा होईल. या आधी सर्वांशी प्राथमिक चर्चा झाली आहे.

भाजप म्हणून आमचीही सर्वांशी चर्चा झाली आहे. अंतिम फॉर्म्युल्यानुसार जागा ठरतील. यामध्ये ठरावाच्या प्रमाणात जागा वाटप व्हावे, यावर सर्वांचे एकमत आहे, तसेच तिन्ही पक्षांच्या ठरावात फारसा फरक नाही. त्यामुळे जागा वाटपावर लवकर निर्णय होईल व तो सर्वांना मान्य होईल, असेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT