Bhagat Singh Koshyari-Shivendra Raje Bhosale
Bhagat Singh Koshyari-Shivendra Raje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यपालांच्या विधानावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘राजघराण्यातील सदस्य म्हणून मी...’

सरकारनामा ब्यूरो

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून चर्चेत आणण्याचे प्रकार जे सुरू आहेत, ते तातडीने थांबवा, असा इशारा देऊन समाजामधील जबाबदार व्यक्तींनी भान ठेवून बोलले पाहिजे, असा सल्ला साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना दिला आहे. (Responsible persons should speak with awareness : Shivendra raje)

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची वादग्रस्त वक्तव्य कोणीही करू नये, असे मी राजघराण्यातील सदस्य म्हणून सर्वांना आवाहन करतो, असेही कोश्यारी यांनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वाद्‌ग्रस्त विधान केले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांच्यावर टीकेचे झोड उठवली जात आहे. त्या विधानावर बोलताना शिवेंद्रसिंह राजे यांनी सर्वांनी बोलताना भान ठेवण्याचे आवाहन केले आहे.

आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जातील, अशी वक्तव्य कोणीच करू नयेत. तसेच, पदावर असणाऱ्या व्यक्तींनी तर करूच नयेत. यामुळे समाजामध्ये वाईट विचार पसरतो. अशा वक्तव्यांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून चर्चेमध्ये आणण्याचे जे प्रकार सुरू आहेत, ते कुठेतरी आता थांबले पाहिजे. समाजामध्ये जबाबदार व्यक्तींनी भान ठेवून बोलले पाहिजे, आपण काय बोलतो, त्याचा मेसेज काय जातोय, हे विचार करून बोलले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य कोणीही करू नये. मी राजघराण्यातील सदस्य म्हणून सर्वांना आवाहन करतो आहे, असे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT