Sangli Political News : उद्याच्या निवडणुकीत रोहित पाटलांना साथ द्या, अशी भावनिक साद ज्येष्ठ शरद पवारांनी घातली. तसेच तासगाव- कवठे महांकाळ मतदारसंघातून रोहित पाटलांची अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीरही केली. मला खात्री आहे, तुमच्या प्रश्नांची सोडवणूक नक्की होईल, असा विश्वास देखील शरद पवारांनी व्यक्त केला. रोहित पाटील Rohit Patil हे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव आहेत.
शरद पवारांनी Sharad Pawar कवठे महांकाळ येथील शेतकरी मेळाव्यात रोहित पाटलांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, आम्ही लोकसभेत चांगले यश मिळवले आहे. निलेश लंकेच्या घरी गेलो होतो. त्यांची 10 बाय 10 ची खोली होती. पण आज लोक ससंदेत विचारतात. हे कैसी चीज हे. असेच चित्र अनेक ठिकाणी आहे. गेले काही वर्षे आम्ही सामान्य कुटुंबातील लोकांना संधी द्यायचे ठरवले आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी Narendra Modi म्हणत होते 400 पार जाणार. ते काही पण बोलत होते. पण काय झाले? नरेंद्र मोदी यांची प्रवृत्ती देशाच्या हिताची नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन करायचे आहे. आजचे राज्यकर्ते कोणासाठी काम करतात हेच मला काही कळत नाही. शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शपथ घेतली, पण अनेक प्रश्न असूनही ते सोडवायची त्यांची तयारी नाही, अशी टीकाही केली.
महाराष्ट्रमध्ये अनेक कारखाना आहेत. त्यांना कर्ज दिली, आणि पैशाची खैरात केली. पण सगळ्यात अडचणीचा दुष्काळी भागातील कारखाना आहे त्याला मदत केली नाही, याकडेही शरद पवारांनी लक्ष वेधत सरकारची कोंडी केली.
पवारांचा आबांच्या आठवणींना उजाळा
शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. 10 वर्षांपूर्वी आमचा सहकारी निघून गेला. त्याच्यामध्ये कर्तृत्व होते. निर्णय घ्यायची दृष्टी आणि ताकत होती. त्या व्यक्तीचे नाव आर. आर. पाटील. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी आर. आर. पाटील जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांना पाहिले आणि हे नाणं खणखणीत आहे असे वाटले. त्यानंतर त्यांनी राज्याचे नेतृत्व केले.
माझी निवड 100 टक्के खरी ठरली आणि आर. आर. पाटील यांनी ग्रामविकासमध्ये चांगले काम केले. त्यानंतर त्यांच्याकडे गृह खाते दिले. आता ते निघून गेले आणि महाराष्ट्र हळवा झाला. पण रोहित याची कमतरता भरून काढेल. महाराष्ट्रला नवीन नेतृत्व देण्याच काम तुम्ही कराल, अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.