Worli Car Accident : 'बीएमडब्लू' कारनं रविवारी पहाटे धडक देत एका मासळी विक्रेत्या महिलेला 2 कि.मी फरफट नेलं. त्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. मिहीर शाह असं कारचालकाचे नाव आहे.
मिहीर शाहने अपघातानंतर न थांबता बेदकारपणे कार चालवून महिलेचा जीव घेतला. कावेरी नाखवा (45), असं मृत महिलेचे नाव आहे. अपघाताचे सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
वरळी पोलिसांनी मिहीरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रकरणी वडील राजेश शाह आणि चालक राजऋषी बिडावत यांना अटक केली आहे. पोलिस मिहीरचा शोध घेत आहेत. मिहीरचे वडील राजेश शाह हे बांधकामासाठी लागणाचा कच्चा माल पुरवतात. ते शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी आहेत.
नेमकं काय घडलं?
मिहीरने शनिवारी रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसह मद्यप्राशन केलं. त्यांचे बिल 18 हजार 730 रूपये झाले. ते त्याच्या मित्रानं भरले. रात्री दीडच्या सुमारास ते बारमधून बाहेर पडले. नंतर मिहीर गोरेगावमधील घरी गेला. त्यानं कारचालकाला लाँग ड्राइव्हसाठी जायचं असल्याचं सांगितलं. कार घेऊन तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावच्या दिशेने निघाला.
गोरेगावला जाताना मिहीर स्वत: गाडी चालवत असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचवेळी त्यानं नाखवा दाम्पत्याला धडक दिली. अपघातानंतर प्रदीप नाखवा कारच्या बोनेटला धडकून बाजूला पडले. तर, कावेरी नाखवा कारच्या बोनेटसमोर आल्या. मिहीरने कावेरी नाखवा यांना दोन किलोमीटर वरळी सीफेस येथील सी लिंकपर्यंत फरफट नेले.
नंतर कार थांबवून गंभीर जखमी अवस्थेतील कावेरी यांना रस्त्यातच सोडून मिहीर वांद्रे-वरळी सागरीसेतूनवरून पसार झाला. मिहरीनं वांद्रे कलानगर परिसरात कार आणि चालक राजऋषी बिडावत याला सोडले आणि तेथून पसार झाला. गंभीर अवस्थेत निपचित पडलेल्या कावेरी यांना पोलिसांनी (Police) नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्यानं मृत घोषित करण्यात आलं.
यानंतर मिहीरनं वडील राजेश शाह यांना फोन करून घटनाक्रम सांगितला. त्यानंतर त्यानं मोबाइल बंद केला. सकाळी 8 वाजेपर्यंत मिहीर प्रेयसीच्या घरी थांबला. नंतर सगळ्या माध्यमांमध्ये वृत्त सुरू होताच मित्राच्या घरी जातो, असं सांगून निघून गेला.
याप्रकरणी पोलिसांनी कलम 105, 281, 125 (ब), 238, 324 (4) भारतीय न्याय संहितासह कलम - 184, 134 (अ), 134 (ब), 187 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.