Rohit Pawar On Malvan Rajkot Fort Chhatrapati Shivaji Maharaja Statue sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar : 'शंभर वर्षे काहीही होणार नाही अस म्हणाले, पण शंभर दिवसही दावा टिकला नाही'; रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

Malvan Rajkot Fort Chhatrapati Shivaji Maharaja Statue : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. तर आता नव्याने उभारलेल्या पुतळ्याच्या चबुतऱ्याशेजारील माती खचली आहे. यावरून सरकारवर जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील चौथऱ्याचा काही भाग खचल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. हा पुतळा अवघ्या महिन्याभरापूर्वी नव्याने उभारण्यात आला होता.

या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र, अवघ्या काही आठवड्यांतच चौथऱ्याजवळील जांभा दगडांचा भाग खचल्यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर्षीच्या सुरुवातीच्या पावसातच या परिसरात ही घटना घडल्याने, संबंधित कामकाजाच्या दर्जावर आणि देखरेख व्यवस्थेवर संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून घटनास्थळी तातडीने पाहणी सुरू केली आहे.

दरम्यान याठिकाणी 2023 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच हा पुतळा वादळी वाऱ्यामध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर राज्यात याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर राज्य सरकारने नव्याने हा पुतळा उभारला होता मात्र या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळं मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता आणि आता नव्याने उभारलेल्या पुतळ्याला शंभर वर्षे काहीही होणार नाही असा दावा सरकारने केला असताना पुतळ्याच्या अनावरणाला शंभर दिवसही झाले नसताना पुतळ्याच्या चबुतऱ्याचा भराव खचला.

यावरुन हे सरकार महापुरुषांचे पुतळे विचारांचा आदर्श आणि प्रेरणा म्हणून उभारतंय की केवळ ठेकेदारांसाठी, असा प्रश्न पडतो. विचारांनाच खोली नसेल तर अशा सरकारकडून पुतळ्याच्या भक्कम पायाची अपेक्षा कशी करणार? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

आता यावर तात्पुरती डागडुजी केली जाईल पण महिन्याभरात भराव कसा खचला याचं उत्तर सरकारने द्यावं. भराव खचल्याचा अर्थ हे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे, हे दिसतं आणि शिवप्रेमी म्हणून आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही.. सरकारने याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT