RSP chief Mahadev Jankar interacting with shepherds during his stay at a sheep camp in Pangari village of Satara district. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahadev Jankar : अंगणातच घोंगडी अंथरली, बनियानवरच झोपले : महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यांचा मेंढपाळांच्या वाड्यावर मुक्काम

Mahadev Jankar : माढा लोकसभा दौऱ्यादरम्यान महादेव जानकर यांनी साताऱ्यातील पांगरी गावातील मेंढरांच्या वाड्यावर मुक्काम केला. मेंढपाळांसोबत संवाद साधत साधेपणाने राहि

Hrishikesh Nalagune

Mahadev Jankar : रानावनात आयुष्य व्यतीत करणाऱ्या मेंढपाळांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी माजी पशुसंवर्धनमंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पांगरी (ता. माण) येथे मेंढरांच्या वाड्यावर केलेल्या मुक्कामाची आणि या मुक्कामावेळी दाखवलेल्या साधेपणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू असताना त्यांनी येथे विसावा घेतला होता.

रासपचे माण तालुका युवक अध्यक्ष तात्याराम दडस यांच्या शेतात मेंढरांचा वाडा आहे. कोणत्याही विशेष सोयीसुविधांची अपेक्षा न ठेवता जानकर थेट या वाड्यावर पोहोचले. मोकळ्या माळरानावर, मेंढपाळांसोबत जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्या रोजच्या संघर्षाची ऊन-वारा-पाऊस झेलत जगणाऱ्या जीवनाची माहिती घेतली. या वेळी त्यांनी स्वतः साधे जेवण करून तिथेच रात्रीचा मुक्काम केला.

यावेळी जानकर म्हणाले, ‘‘मेंढपाळांसोबत माळरानावर मुक्काम करताना मला माझ्या ५० वर्षांपूर्वीच्या बालपणाची आठवण झाली. मी पुन्हा एकदा माझ्या त्या संघर्षमय जीवनाचा भाग झालो असे मला वाटते. मेंढपाळांचे कष्ट मी जवळून पाहिले आहेत, म्हणूनच त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ओढ कायम असते, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

जानकर यांनी मेंढपाळांच्या अडचणी, स्थलांतर, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पाण्याची टंचाई आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडथळ्यांबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. या मुक्कामाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही त्याची चर्चा सुरू झाली आहे.

तर रासपचे सरचिटणीस शरद दडस म्हणाले, महादेव जानकर यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात मेंढपाळांसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले होते. मेंढपाळांना विमा संरक्षण देणे, मेंढ्यांचा विमा उतरवणे आणि शेळी-मेंढीसाठी निवारा सुरू करणारे ते पहिलेच मंत्री ठरले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT