Hatkanangale Nagarpanchayat sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hatkanangale Nagarpanchayat : श्रेयवादावरून सत्ताधारी-विरोधक भिडले, हातकणंगले नगरपंचायतीच्या सभेत गोंधळ

Hatkanangale Nagarpanchayat Ruling Party Opposition argument : हातकणंगले नगरपंचायतीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले. श्रेयवादावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.

Rahul Gadkar

Hatkanangale Nagarpanchayat News: एकमेकांच्या प्रभागांत कामे मंजूर करण्यावरून आज (सोमवारी) हातकणंगले नगरपंचायतीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले. श्रेयवादावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. आपापल्या वार्डाला निधीवरून दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. अखेर दोन तासानंतर इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत निधी मंजूर केला. मात्र श्रेयवादावरून झालेली वादावादी शेवटच्या सभेत चांगलीच चर्चेचा विषय ठरली.

हातकणंगले नगरपंचायतीची मुदत संपत आल्याने आज (सोमवारी) शेवटच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अर्चना जानवेकर होत्या . यावेळी प्रभाग क्रमांक पाचमध्ये निधी लाटण्यावरून काही सदस्यांमध्ये वादावादी झाली . सुमारे दोन तास ही चर्चा सुरूच होती. शेवटी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊनच निधी मंजूर करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला .

सांडपाणी प्रक्रीया केंद्र येत्या दीड वर्षात पूर्ण करण्याचे पत्र संबंधित यंत्रणेला दिले असून ते पूर्ण न झाल्यास सुमारे अडीच कोटीचा दंड नगरपंचायती कडून वसूल करण्यांत येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी यावेळी दिली .

अंतर्गत रस्ते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत रंगकाम, स्मारक शिल्प सुरक्षा, वाचनालयांत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर पुस्तके, विनापरवाना फलक, सानुग्रह अनुदान यावर सविस्तर चर्चा करण्यांत आली. कचरा उचलण्याच्या ठेक्याची मुदत सप्टेंबर अखेर संपली असतानाही त्याला मुदतवाढ देण्यावरही काही जणांनी आक्षेप घेतला . त्यावर विशेष सभा घेऊन निर्णय घेण्याचे ठरले .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT