Solapur, 08 November : शिवसेना नेते तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बाप काढला होता. त्याला भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सडतोड प्रत्युतर दिले आहे. म्हेत्रे तू आणि तुझ्या खानदानाने शेतकऱ्यांचे किती पैसे बुडवले? हिम्मत असेल त्यांची देणी फेड. पुन्हा असा प्रकार केला तर तुझा, तुझ्या खानदानाचा, पिलावळीचा आणि तुझ्या नेत्याचा सगळ्यांचा बाप मी कबाढेन, असा खणखणीत इशारा दिला आहे.
सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याच्या प्रयत्न करतात. सिद्धाराम म्हेत्रे यांनी हे सगळं बोलत असताना हे लक्षात ठेवावं की, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी म्हणून साखर कारखाना काढला. पण, त्यातून शेतकऱ्यांच्या नावाने खोटी कर्ज प्रकरणं केली. शेतकऱ्यांना लखपती योजना सांगून पैसे काढले. पण पैसे भरले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब केले.
आम्ही 2 असो की 4 हजार रुपये असो, शेतकऱ्यांना मदत करतो. म्हेत्रे तू आणि तुझ्या खानदानाने कारखान्याच्या नावाने शेतकऱ्यांचे किती पैसे बुडवले? हिंमत असेल तर शेतकऱ्यांचे किती पैसे द्यायचे आहेत, ते व्याजासहित देता येतात का, याचा प्रयत्न कर, असा सल्ला कल्याणशेट्टी यांनी म्हेत्रेंना दिला.
कल्याणशेट्टी म्हणाले, पैसे देणाऱ्याची चेष्टा करू नको. कोणीही कोणाच्या बापाच्या घरचा पैसा देत नाही. म्हेत्रे तू स्वतः ह्या शेतकऱ्यांचा देणेकरी आहेस, तुझ्याकडे, तुझ्या बापाकडे पैसे असतील तर आधी देणी फेड. नसतील तर तुझा जो राजकीय बाप वर बसला आहे, त्याच्याकडून घेऊन फेड. माझ्या नेत्याचा बाप काढायचा नाही, आज दिवाळी असल्याने तोंड खराब करून घेणार नाही
म्हेत्रेने पण इथून पुढे जर असा प्रकार केला तर तू, तुझा बाप, तुझ्या नेत्याचा, पिलावळचा सगळ्यांचा बाप मी काढेन. ज्या वेळी एखादा शब्द बोलतो त्यावेळी आम्हीसुद्धा बोलू शकतो हे म्हेत्रे आणि त्याच्या नेत्यानेही लक्षात ठेवावं, असा इशाराही कल्याणशेट्टी यांनी दिला.
कल्याणशेट्टी म्हणाले, म्हेत्रे हा अपयशी माणूस आहे. सर्व सत्तास्थानं त्याने गमावली आहेत. म्हेत्रेचा दोनदा तालुक्यातील जनतेने मोठा पराभव केला आहे. राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी भाजपत यायचा प्रयत्न केला, तेव्हा भाजपने हाकलून लावलं. राष्ट्रवादीत जाण्याचा प्रयत्न केला, अजित पवारांनीही हाकलून दिलं. कसं बस एकनाथ शिंदेंना पटवून शिवसेनेत गेला. प्रवेशाच्या वेळी काहीतरी पाकीट मिळालं असेल त्यानंतर काही मिळालं नाही. सत्तेत राहून ही काही मिळतं नसल्याच्या वैफल्यग्रस्त अवस्थेमुळे काय करावे, याचं भान राहिलेलं नाही, त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ते असं बोलत असतात.
म्हेत्रेनी आयुष्यभर टक्केवारीचा धंदा केला, रोज टक्केवारी आणि दोन नंबर धंद्याचा हिशेब केला म्हणून या तालुक्यातील जनतेने त्याला चपराक मारून घरी बसवलं आहे. म्हेत्रेच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. जनता मला आशीर्वाद देते, जनता माझ्या पाठीशी आहे. म्हेत्रेसारख्या टाकून दिलेल्या माणसाच्या सर्टिफिकेटचे मला गरज नाही.
स्वतःचा मेहुणा दरवाज्यात बसून गुटखा खातं थुंकत बसायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांकडून पैसे मागायचा. अशा माणसाने दुसऱ्याच्या कुटुंबार, मेहुण्यावर बोलू नये. म्हेत्रेनी काळजी घ्यावी, असं बोलत राहिला तर विषय लांबपर्यंत जाईल, असा इशारा आमदार कल्याणशेट्टी यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.