Hatkanangale Loksabha News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी विरोधात महायुतीचे खासदार धैर्यशील माने अशी लढत आहे. तर महायुतीसोबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत असल्याने त्याला अधिक रंगत आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका करण्याचा एकही चान्स सदाभाऊ खोत सोडत नाहीत. आजही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या नियोजन बैठकीत शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हाच राज्यात सर्वात जास्त चर्चेचा विषय बनला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे या मतदारसंघातून रिंगणात असल्याने त्यांच्या विरोधात महायुतीचे खासदार धैर्यशील माने निवडणूक लढवत आहेत, तर महायुतीसोबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत असल्याने त्याला अधिक रंगत आली आहे.
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे राजू शेट्टींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सदाभाऊ खोत म्हणाले, महान शेतकरी नेत्यांचे एकला चलो वगैरे असं काही नव्हतं. सर्वांच्या दाराला जाऊन आरत्या करून आलेले हे नेते आहेत. भाजपलादेखील आतल्या अंगाने सांगितलं होतं की निवडून आलो की मी तुमचाच.
महाविकास आघाडीकडे मातोश्रीवर जाऊनदेखील उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, की आदानींना आपल्याला गाढायचा आहे. मात्र, महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यानंतर आता अभिमन्यूसारखं बोलत सुटलेत. माझ्यासाठी चक्रव्यूह केलाय तो भेदायचा आहे, असं सांगत आहे. पण, अभिमन्यू पांडवांच्या बाजूने लढत होता, तुम्ही कौरवांच्या बाजूने लढत आहात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कौरवांमध्ये अभिमन्यू जन्माला आलाय हे मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बघत आहे. राजू शेट्टी म्हणजे कौरवांचा अभिमन्यू आहे. त्यांच्या हातात आता गळा काढण्याशिवाय काही राहिले नाही, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी टोला लगावत 'त्यांचा नंबर आता 'थ्री वर, इधर नही आना, उधर ही रहना, सर्व काम खतम...' अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची खिल्ली उडवली आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.