रयत क्रांतीचे प्रमुख सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, महायुतीनं पुन्हा एकदा हातकणंगलेमधून शिवसेनेच्या धैर्यशील माने ( Dhairyashil Mane ) यांना उमेदवारी दिली आहे. यातच सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( devendra Fadnavis ) यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
"एकलव्यानं एक अंगठा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दोन अंगठे देण्याची वेळ आली, तर मी देण्यासाठी तयार आहे," असं विधान सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं असून, खोत यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रयत क्रांती संघटनेचे इस्लामपूर येथे मेळावा पार पडला. या वेळी सदाभाऊ खोत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीसांबद्दल ( Devendra Fadnavis ) हे विधान केलं आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुटुंबप्रमुख म्हणून आमचा विश्वास आहे. महाभारतात एकलव्यानं द्रोणाचार्यांना एक अंगठा दिला होता. पण, देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्त्वासाठी मला दोन अंगठे देण्याची वेळ आली, तर ते देण्यासाठीही मी पुढं-मागे बघणार नाही."
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी इस्लामपूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीतील घटक पक्षांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हा, सदाभाऊ खोत यांनी हातकणंगलेमधून महायुतीनं उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. 2019 पासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून तयारी करत असल्याचं खोत यांनी सांगितलं होतं. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ रयत क्रांतीला मिळावा, अशी भूमिका खोत यांनी मांडली होती. पण, अखेर शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना हातकणंगलेमधून उमेदवारी मिळाली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.