Raju Shetti News : हातकणंगलेमध्ये काड्या करण्यातच कारखानदार व्यस्त; राजू शेट्टींचा निशाणा कोणावर ?

Political News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हातकणंगले लोकसभेसाठी राजू शेट्टी यांनी सोमवारी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama

Kolahapur News : सगळे कारखानादार हातकणंगले मतदारसंघामध्ये काड्या करण्यात सामील आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे या निवडणुकीसाठी आधी उमेदवार देणार नव्हते, पण चाव्या कुटून फिरल्या काही माहित नाही. यामध्ये जयंत पाटील, सतेज पाटील सहभागी असतील असे वाटते. त्यामुळेच शेवटी उद्धव ठाकरेंनी हातकणंगलेमध्ये उमेदवार दिला आहे, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Snghatna) हातकणंगले लोकसभेसाठी राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सोमवारी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका केली. (Raju Shetty News )

Raju Shetti
Prithviraj Chavan On NCP : राष्ट्रवादीचा दगा अन् राज्यात भाजपची एन्ट्री; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदेंनी रडीचा डाव बंद करावा, कार्यकर्त्यांना नोटीसा दिल्या आहेत. गेल्या काही विरोधकांतील काहीजण ईडीला घाबरून भाजपमध्ये जातील. ईडीला मी हिंगलत नाही. मला पाठवावी एकदा ईडीने नोटीस पाठवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. कार्यालयावरच मोर्चा काढावा अशी परिस्थिती असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने यापुढचा लढा विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगारासाठी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वच मुद्द्यांवर लढा देण्याची तयारी ठेवली असल्याचे यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजू शेट्टी व हसन मुश्रीफांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा

यावेळी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राजू शेट्टी व हसन मुश्रीफ यांची समोरासमोर भेट झाली. त्यामुळे एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ व कोल्हापूर मतदारसंघातील दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून येतील. जिल्ह्यातील सर्व नेत्यांची नाराजी दूर केली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांची नाराजी दूर केली आहे. धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी ते स्वतः हजर होते, असे यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

(Edited By : Sachin Waghmare)

Raju Shetti
Raju Shetti News : राजू शेट्टींना रोखण्यासाठी सरकारची खेळी; स्वाभिमानीच्या दोनशे कार्यकर्त्यांना नोटीस

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com