Sadabhau Khot Protest : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadabhau Khot Protest : राजू शेट्टींचं आंदोलन शमल्यानंतर आता सदाभाऊंचा भडका उडणार; थेट सरकारला इशारा...

Sadabhau Khot Protest Milk Rate Protest : दूधदराची बैठक फिस्कटली, आता आंदोलनाचा भडका उडणार...

Chetan Zadpe

Sangli News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला यश आल्यानंतर आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती आहे. दूधदर वाढ करण्यावरून पुन्हा एकदा रयत क्रांती संघटना आक्रमक झाली असून, सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने दूधदरात वाढ करावी, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल, असा इशाराच खोत यांनी राज्य सरकारला दिला आहे. (Latest Marathi News)

राज्य शासनाने दिनांक २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे सहकारी व खासगी दूध संघ दूध उत्पादकांना दूधदर देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. आज राज्यभर दिनांक २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूधदर परिपत्रकाची सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन शासन परिपत्रकाची होळी करण्यात आली.

शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर राज्यामध्ये दूध आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. या वेळी डी. के. पाटील, सरपंच संदीप खोत, प्रशांत पाटील, सुहास पाटील, महादेव खोत, योगेश शिंगाडे व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य सरकार बरोबर बैठक निष्फळ -

दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी रयत क्रांती संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दूध उत्पादकांना वाढवून दर मिळावा ही मागणी केल्यानंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकरी संघटनांनी राज्य सरकार व सोबत बैठक आयोजित केली होती. मात्र, यात तोडगा न निघाल्याने ही बैठक निष्फळ ठरली होती. यामुळे आता सदाभाऊ खोत आंदोलनाचा भडका उडण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT