Sadabhau Khot News : बारामतीत जाऊन पवारांना आव्हान देणारे सदाभाऊ खोत अजितदादांच्या स्वागताला...

Ajit Pawar Kolhapur Tour : ...त्यांना आता आमदारकीसाठी अजित पवारांचा वरदहस्त हवा आहे.
Sadabhau Khot - Ajit Pawar
Sadabhau Khot - Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

संपत मोरे

Sangli : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आजवर सातत्याने शेलक्या शब्दात टीका करणारे माजी मंत्री सदाभाऊ खोत रविवारी सांगली जिल्ह्यातील पेठनाका येथे अजितदादा यांच्या सत्कारासाठी आवर्जून उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या महाडिक कुटुंबाने अजित पवारांना भला मोठा हार घालून सत्कार केला.

यावेळी तो भला मोठा हार पेलताना सम्राट महाडिक यांच्यासोबत सदाभाऊ होते. एकेकाळी केवळ राज्यातच नाही तर अगदी बारामती इंदापूरला जाऊन अजितदादा पवार यांच्यावर कडवट टीका करणाऱ्या खोतांनी आज मात्र बदलती राजकीय परिस्थिती स्वीकारताना दादांचे उत्साहात स्वागत केले.

Sadabhau Khot - Ajit Pawar
Sharad Pawar News : '' महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला ७० ते ८० जागा मिळणार...'' ; शरद पवारांचं मोठं विधान

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार(Ajit Pawar) हे कोल्हापूरच्या सभेला जाताना जयंत पाटील यांच्या वाळवा तालुक्यातील सर्व विरोधकांनी पेठ नाक्यावर त्यांचे भव्य स्वागत केले. महाडिक कुटूंबातील राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनी या स्वागत सोहळ्याचे नियोजन केले होते. 2019 साली इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही हजेरी लावून दादांचा सत्कार केला.

राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजितदादा पवार यांच्यावर आजवरच्या राजकीय कारकीर्दमध्ये टोकाची टीका करणारे,पवार फॅमिलीला टार्गेट करून राजकीय समीकरण उभे करणाऱ्या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही आज अजित पवार यांच्या सत्काराला उपस्थिती दाखवली. दादांचा सत्कार करण्यासाठी आणलेला भल्या मोठा हार सत्कारसमयी पेलताना सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) ही महाडिक कुटूंबाच्यासोबत होते.अजितदादांच्या सत्काराला वाळवा तालुक्यातील जयंत पाटील यांचे विरोधक एकवटले होते. आपआपसात मतभेद असूनही ते अजित पवार यांच्या स्वागताला हजर होते.

Sadabhau Khot - Ajit Pawar
Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडेंची खदखद पुन्हा बाहेर; म्हणाल्या, '' एवढ्या वेळा नाकारले तरी...''

जयंत पाटील(Jayant Patil) यांच्याविरोधात असलेल्या महाडिक, निशिकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांना अजितदादा पवार यांच्याकडून आगामी काळात राजकीय सहकार्याची अपेक्षा आहे हे निश्चित आहे. जयंत पाटील यांचा आजचा विरोधक तो आपला मित्र या सूत्रांनुसार त्यांनी अजितदादा यांचे स्वागत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेसुद्धा अजितदादांकडून ताकद मिळावी अशीही अपेक्षा असण्याची शक्यता आहे.

इस्लामपूर आणि शिराळा या दोन मतदारसंघावर जयंत पाटील यांचा प्रभाव आहे, शिराळ्यातून सम्राट महाडिक इच्छुक आहेत तर वाळव्यातून निशिकांत पाटील पुन्हा इस्लामपूरमधून उमेदवारी करतील अशी शक्यता आहे. या दोघांनाही आता आमदारकीसाठी अजित पवारांचा वरदहस्त हवा आहे असाच या स्वागत सोहळ्याचा अर्थ आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com