Sadashivrao Patil-Vaibhav Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vaibhav Patil Join Ajitdada Group : वडील शरद पवारांसोबत, तर पुत्राने धरली अजितदादा गटाची वाट..!

Sangli politics : वैभव पाटील हे शक्तिप्रदर्शन करत अजितदादांना भेटायला जायच्या तयारीत होते, तेव्हा पाटील मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या बैठकीला होते.

संपत मोरे

Sangli News : राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणात सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातील सर्व प्रमुख नेते सत्तेसोबत गेल्याने महाविकास आघाडीचा तंबू रिकामा झाला आहे. शरद पवार यांच्यासोबत राहिलेल्या विट्याच्या पाटील घराण्यातील वैभव पाटील यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने खानापूर मतदारसंघातील सर्व परस्परविरोधी नेते सत्तेसोबत आहेत, अपवाद फक्त विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा आहे. त्यांचे सुपुत्र वैभव पाटील हे शक्तिप्रदर्शन करत अजितदादांना भेटायला जायच्या तयारीत होते, तेव्हा पाटील मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या बैठकीला होते. पाटील पिता-पुत्राच्या परस्परविरोधी भूमिकेने मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (Sadashivrao Patil joined Sharad Pawar's group, while his son joined Ajit Pawar's group)

खानापूर विधानसभा मतदारसंघावर आमदार अनिल बाबर यांचा १९९० पासून प्रभाव राहिला आहे. त्यांनी चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विधानसभेच्या २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत मात्र सदाशिवराव पाटील यांनी बाबर यांना पराभूत केले. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सदाशिवराव पाटील यांना पराभूत केले. पण, नंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रितपणे सत्तेत आल्याने अनपेक्षितपणे हे दोन नेते सत्ताधारी गटाचा भाग बनले. तेव्हा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख हे विरोधी गटात कार्यरत होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप सरकारमध्ये अनिल बाबर, गोपीचंद पडळकर, राजेंद्र देशमुख आणि तानाजी पाटील हे सत्ताधारी गटाचा भाग बनले. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले, तेव्हा विट्याच्या पाटील घराण्याने शरद पवार यांच्या गटासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. पण, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शनिवारी अचानकपणे अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील बाबर, पडळकर, देशमुख, विट्याचे वैभव पाटील आणि आटपाडीचे तानाजी पाटील हे सर्व नेते महायुतीचा भाग बनले आहेत.

वैभव पाटील जेव्हा अजित पवार यांच्या स्वागतासाठी वाजतगाजत जायची तयारी करत होते, तेव्हा त्यांचे वडील माजी आमदार सदाशिवराव पाटील हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या सांगली कार्यालयात बैठकीला हजर होते. पाटील पिता-पुत्रांमधील या परस्परविरोधी भूमिकेमुळे खानापूर मतदारसंघात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुत्र अजित पवारांसोबत, तर वडील शरद पवार यांच्यासोबत असे चित्र निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT