Dharashiv Loksabha : पंकजा मुंडेंसाठी संजय बनसोडेंचा आग्रह; काकांप्रमाणे पुतण्याही १९७२ ची पुनरावृत्ती करणार?

Pankaja Munde News : पंकजा मुंडे यांनी धाराशिव मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी, असे साकडे मित्रपक्ष रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) थेट पंकजा यांना घातले आहे.
Pankaja Munde-sanjay Bansode
Pankaja Munde-sanjay BansodeSarkarnama

Paranda News : राज्याच्या राजकारणापासून दूर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी धाराशिव मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी, असे साकडे मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) थेट पंकजा यांना घातले आहे. पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा आज परांड्यात आली असता आठवले गटाचे प्रदेश चिटणीस संजय बनसोडे यांनी ही आग्रहाची मागणी केली. त्यामुळे धाराशिवमधून मुंडे यांच्या नावाचा पर्यायही भाजपपुढे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Pankaja Munde should contest Lok Sabha from Dharashiv; Athawale urged the group)

दरम्यान, परांडा विधानसभा मतदारसंघातून वासुदेवराव देशमुख यांनी रिपब्लिकन पक्षाकडून १९७२ मध्ये हत्तीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत ते विजयीही झाले होते. त्यावेळी बनसोडे यांचे चुलते मारुतीराव बनसोडे यांनी पुढाकार घेतला होता. आता पंकजा मुंडे यांच्यासाठी पुतणे संजय बनसोडे आग्रही आहेत.

Pankaja Munde-sanjay Bansode
Baramati politics : अजितदादांनी बारामतीत भाकरी फिरवली; ‘माळेगाव’च्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचे राजीनामे मंजूर

धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची उभारणी (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. बीडमधील डॉ विमल मुंदडा यांनी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली १९९१ मध्ये धाराशिवमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्यांना त्या निवडणुकीत दीड लाखाच्या वर मते पडली होती. जिल्ह्यातील अनेक नेत्यांना मुंडे यांनीच पुढे आणलेले आहे. पण, अपवाद वगळता मूळ भाजपचा एकही ताकदवार नेता पक्षाकडे धाराशिवमध्ये सध्यातरी नाही.

Pankaja Munde-sanjay Bansode
Ramesh Kadam Mohol Tour : माजी आमदार रमेश कदम २४ सप्टेंबरला मोहोळ दौऱ्यावर; कोणाचे गणित बिघडणार…कोणाला फायदा होणार?

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षात आलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव सध्या धाराशिव लोकसभेसाठी आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनाही ऐनवेळी लोकसभेच्या आखाड्यात उतरवले जाऊ शकते.

Pankaja Munde-sanjay Bansode
Congress Jansamvad Yatra : भाजपकडून देशात ब्रिटिशनीतीचा अवलंब; काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहिते पाटलांचा आरोप

भारतीय जनता पक्षात इनकमिंग जोरात झालेले असले तरी गटबाजीचे ग्रहण पक्षाला लागल्याचे दिसून येते. भाजप लोकसभेच्या तयारीला लागलेला असताना शिवशक्ती परिक्रमा ही पंकजा मुंडे यांची ताकद दाखवणारी ठरली आहे. त्यातच मित्र पक्ष रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने पंकजा यांनी धाराशिवमधून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी केल्याने धाराशिव मतदारसंघ चर्चेत आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com