Samarjeet Ghatge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Samarjeet Ghatge : 'महिन्यापूर्वीच महायुतीत आलोय...', समरजीत घाटगेंनी गोकुळ वादावर बोलणे टाळले

Samarjit Ghatge statement on Gokul issue : अलीकडेच महायुतीत सामील झालेल्या समरजीत घाटगे यांनी गोकुळ वादावर बोलणे टाळले. जाणून घ्या या राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा.

Rahul Gadkar

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या राजकारणावर सुरू असलेल्या घडामोडीत आज शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी थेट बोलणे टाळले. मात्र गोकुळ दूध संघावर प्रशासक का आले याचा तांत्रिक मुद्दा स्पष्ट केला.अ वर्गाच्या संस्था असतात त्यासाठी सरकारचा नवा कायदा आहे.

मुदत संपल्यानंतर लगेच प्रशासक येणार होते. कायद्यानेच गोकुळवर प्रशासक नेमले आहे. यामध्ये संचालक मंडळ चुकले आहे असे नाही. मुख्यमंत्री कायद्याला बांधील आहेत, असे स्पष्टीकरण समरजीत घाटगे यांनी दिले.

महायुतीम्हणून सुरु असलेल्या वादावार मात्र बोलणे टाळले. मी महायुती मध्ये एक महिना प्रवेश झाला. त्यामुळे मी विनाकारण बोलणे योग्य नाही. असे घाटगे म्हणाले. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिना निमित्त आज नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळ येथे अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेत, २०२६-२७ हंगामासाठी प्रति क्विंटल 365 रुपये 'एफआरपी'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिले आहे. त्यावर समरजीत घाटगे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. पण कारखानादारांची अडचण मांडली. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय योग्य पण परिस्थितीत वेगळी आहे.

अनेक कारखानदारांची थकबाकी अधिक आहे. Msp चा निर्णय नाही झाला तर शेवटच्या क्षणी कारखानादराची बिले थकण्याची शक्यता आहे. कारखानादारांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विशेष पॅकेज देण्याची मागणी करणार आहे. असे घाटगे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT