Chandrapur Murder Case : महाराष्ट्र हादरला! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच दिली शिक्षक नवऱ्याच्या हत्येची सुपारी

Wife Kills Husband for government Job : रवींद्र कुलमेथे असं हत्या झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. तर भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोडपेठ परिसरातील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी सकाळी रवींद्र कुलमेथे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला.
Chandrapur Murder Case | Wife Kills Husband for Job
Chandrapur Murder Case | Wife Kills Husband for Jobsarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Murder Case : चंद्रपूर जिल्ह्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची धक्कादायक आणि पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

रवींद्र कुलमेथे (46) असं हत्या झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. तर भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोडपेठ परिसरातील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी सकाळी रवींद्र कुलमेथे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला.

यावेळी मृताच्या गळ्यात प्लास्टिकची पिशवी आणि त्यावर दुपट्टा बांधलेलं होता. यावरून ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून मृताची ओळख पटवली असता ते गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रहिवासी असल्याचं समोर आलं.

त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांची गळा आवळून हत्या केल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तपासादरम्यान रवींद्र कुलमेथे यांची पत्नी दीपमाला कुलमेथेची चौकशी केली असता तिने हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. यावेळी तिने पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळल्यामुळे हे कृत्य केल्याचं सांगितलं.

Chandrapur Murder Case | Wife Kills Husband for Job
Pune Crime : 9 वर्षाच्या नातीवर नराधम आजोबाकडून अत्याचार; पुण्याच्या पर्वती परिसरातील घटना शेजाऱ्यांमुळे आली उजेडात, नेमकं काय घडलं?

तिने पोलिसांना सांगितलं की, ती पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळली होती. अशातच नागपूर येथे ती उपचारासाठी गेली असता तिची भेट वर्षा परचाके नावाच्या महिलेशी झाली. वर्षाने तिला पतीच्या हत्येचा सल्ला दिला आणि दीपमालाने वर्षा, ​​प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांच्या मदतीने 1 लाखाची सुपारी देत पतीच्या हत्येचा कट रचला.

ठरल्यानुसार 29 एप्रिल रोजी दीपमालाने पतीला दिघोरी येथे एका नातेवाईकाच्या लग्नाला बोलावलं. दुसऱ्या दिवशी सोनू कालोकर आणि नाझीर अंसारी कार घेऊन तिथे पोहोचले. यावेळी दीपमालाने पतीला आरोपींच्या ताब्यात दिलं. आरोपींनी दीपमालाच्या नवऱ्याला घोडपेठच्या निर्जन भागात नेलं आणि कारमध्ये गळा आवळून त्यांची हत्या केली.

Chandrapur Murder Case | Wife Kills Husband for Job
Shocking Crime in Pune: थरकाप उडवणारी घटना! 9 वर्षांच्या लेकीचा कटरने खून; बापाचं राक्षसी रूप पाहून पुणे हादरलं

धक्कादायक बाब म्हणजे, हे पती-पत्नी अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते. मात्र, पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल, या स्वार्थापोटी पत्नीने आपल्या नवऱ्याला संपवल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com