samarjit ghatge; gokul election politics sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

samarjit ghatge : भाजप पक्षप्रवेशाला मुहूर्त सापडेना, गुरूंचा आशीर्वाद घेऊन समरजीत घाटगे सक्रिय, गोकुळ संदर्भात बैठक

Samarjit Ghatge Meeting with Chandrakant Patil over Gokul Election: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समरजीत घाटगे यांच्या पुन्हा भाजपमध्ये प्रवेशासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Rahul Gadkar

  1. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे हे पुन्हा भाजपमध्ये सक्रिय होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  2. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आशीर्वाद घेऊन घाटगे भाजपच्या बैठकीत आणि कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

  3. गोकुळ संदर्भातील भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीत घाटगे उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या घरवापसीची शक्यता वर्तवली जात आहे.

kolhapur News : भाजपसोबत फारकत घेऊन विधानसभा निवडणूक महायुतीच्या विरोधात लढलेल्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांच्या पक्ष प्रवेशाला अद्याप मुहूर्त मिळालेला नसून त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. तरीही ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहून पक्षाच्या कार्यात सक्रिय झालेले आहेत. राजकारणात गुरु मानलेले राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आशीर्वाद घेऊन समरजीत घाटगे पुन्हा एकादा भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत. दरम्यान ते भाजपच्या विविध बैठकांना उपस्थिती लावत असून आता उद्या (ता.०६) होणाऱ्या गोकुळ संदर्भाच्या (भाजप) महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थिती असणार आहेत. तर चार दिवसांपूर्वी भाजप कार्यालयात देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका कार्यक्रमात घाटगे यांनी उपस्थिती लावली होती.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समरजीत घाटगे हे पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र सुरुवातीला वरिष्ठांनी दिलेला नकार आणि त्यानंतर झालेल्या चर्चेअंती घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात होता. पक्षप्रवेश करण्यासंदर्भात दिवस निश्चित करत असताना सुरुवातीला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आडव्या आल्या.

त्यानंतर पक्षप्रवेश होईल असे सांगितले जात होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा झाला. त्यावेळी देखील घाटगे यांचा पक्षप्रवेश झाला नाही. राज्यातील महानगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर हा पक्ष प्रवेश लांबला होता. मात्र आता पक्षप्रवेशाची वाट न पाहता भाजप पक्षाच्या कार्यात सक्रिय झालेले आहेत.

उद्या भाजपची बैठक

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने संस्था प्रतिनिधींचे ठराव गोळा करणे ते दुग्धविकास ऑफिस या ठिकाणी देणे त्याची पडताळणी करणे, तसेच दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कच्ची पक्की मतदार यादी तयार करणे, अशी प्रक्रिया निवडणुकीच्या निमित्ताने सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांच्या दूध संस्था आहेत त्यांना या ठराव प्रक्रियेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे .

या बैठकीला महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक आमदार शिवाजीराव पाटील ,आमदार अमल महाडिक आमदार राहुल आवाडे ,माजी आमदार सुरेश राव हळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भरमू अण्णा पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, समरजीत सिंह घाटगे, ग्रामीण पूर्वचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर आदी उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य पंचायत समितीचे सदस्य, जिल्ह्यातील भाजपचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व दूध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे.

FAQs :

1. समरजीत घाटगे कोण आहेत?
समरजीत घाटगे हे कोल्हापूरमधील शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि प्रभावी राजकीय नेते आहेत.

2. घाटगे यांची भाजपमध्ये घरवापसी होणार का?
ते भाजपच्या बैठकीत सक्रिय दिसत असल्याने घरवापसीची चर्चा जोर धरत आहे.

3. चंद्रकांत पाटील यांची भूमिका काय आहे?
घाटगे हे चंद्रकांत पाटील यांना राजकारणातील गुरु मानतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सक्रिय झाले आहेत.

4. गोकुळ बैठकीचे महत्त्व काय आहे?
गोकुळ संदर्भातील भाजपची ही महत्त्वाची बैठक असून त्यात घाटगे सहभागी होणार आहेत.

5. घाटगे यांनी आधी भाजप सोडले होते का?
होय, त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT