Samarjit Ghatge: मुश्रीफांविरोधात 'वस्तादा'ने मोठा डाव टाकलाच; फडणवीसांच्या विश्वासू नेत्यालाच पवारांनी 'कागल'च्या आखाड्यात उतरवलं!

Chandgad and Ichalkaranji Assembly Constituency : चंदगड, इचलकरंजी मतदारसंघातील इच्छुक मात्र उमेदवारी घोषित होण्याच्या प्रतीक्षेतच
 Sharad Pawar, Samarjit Ghatge, Mushrif
Sharad Pawar, Samarjit Ghatge, MushrifSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar NCP Candidate List: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पहिली यादी जाहीर झाली. या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ येणार आहेत.

दोन्ही राष्ट्रवादीत लढत होणार असल्याने राज्याच्या राजकारणात कागल विधानसभा मतदार संघ केंद्रस्थानी आला आहे. दरम्यान जिल्ह्यातून तीन मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जाणार असल्याची माहिती आहे. केवळ कागल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केल्यानंतर चंदगड आणि इचलकरंजी मतदारसंघातील उमेदवार अजूनही प्रतीक्षेत आहे.

समरजीत घाटगे(Samarjit Ghatge) हे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. शिवाय राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांच्या जनक घराण्याचे वारसदार आहेत. स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे यांचे ते चिरंजीव असून कुटुंबातूनच राजकीय बाळकडू मिळाले आहे.

2014 पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. राजकीय गुरू भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली.

 Sharad Pawar, Samarjit Ghatge, Mushrif
NCP SP Candidate List: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवार यादी जाहीर, बारामतीचाही चेहरा ठरला

भाजपमध्ये(BJP) प्रवेश करून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला म्हाडाचे अध्यक्षपद, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद भूषवले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला ही जागा गेल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात लढत असताना त्यांचा जवळपास 22 हजारांच्या मतांनी पराभव झाला. मात्र त्यांनी मिळवलेले मताधिक्य हे लक्षवेधी होते.

 Sharad Pawar, Samarjit Ghatge, Mushrif
Radhanagari, Shahuwadi Constituency : उद्धव ठाकरेंनी राधानगरीतून आयता उमेदवार शोधला, तर शाहुवाडीतून सरूडकरांना संधी!

महायुतीमुळे अडचण निर्माण झाल्याने त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar) यांच्या पक्षात प्रवेश केला. भाजपचा राजीनामा देत त्यांनी महायुतीच्या विरोधातच रणशिंग फुंकले आहे. आज शक्ती प्रदर्शन करत त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून चंदगड आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जाणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप चंदगड मधून कोण उमेदवार असणार हे गुलदस्त्यात आहे? दरम्यान चंदगड मधील उमेदवाराला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची उमेदवाराबाबत उत्सुकता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com