Samarjit Ghatge's Trouble Between NCP : समरजित घाटगे शरद पवारांपासून दुरावले? जाहिरातीतून फोटो गायब

Samarjit Ghatge's Entry In BJP : विधानसभा निवडणुकीत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर ते कोणत्याच भूमीकेत दिसत नाहीत. यामुळे आता उलट सूलट चर्चांना उत आला आहे.
Samarjeet Ghatge
Samarjeet GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा एकत्रितपणे महायुतीने लढवली पण विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा पेच निर्माण झाल्यानंतर कागलच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी मुश्रीफ यांना पराभव करण्याचा विडा उचलला. स्वतःचे अस्तित्व ठेवण्यासाठी महायुतीतून बाहेर पडत थेट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा झेंडा हातात घेतला. मात्र विधानसभा निवडणुकीतही घाटगे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्चतंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील यांना गुरुस्थानी मानणाऱ्या घाटगे यांच्यावर भाजपला रामराम ठोकण्याची वेळ आली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पुन्हा एकदा घाटगे यांची पावले भाजपकडे वळत आहेत की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. नुकताच त्यांचा वाढदिवस पार पडला. या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवरूनच थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गायब झाल्याने त्यांच्या भाजप भविष्याबद्दल शंकेची पाल चुकचूकली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागल विधानसभा मतदारसंघात येऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली. महायुती म्हणून उमेदवारी मिळवण्यास घाटगे यांना भाजपमधून अपयश आले. मात्र कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवून मुश्रीफ यांचा पराभव करण्यासाठी सज्ज झालेले घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकला. आणि थेट तुतारी हातात घेतली. विधानसभा निवडणुकीत मुश्री विरुद्ध घाटगे असा संघर्ष झाला. पण या निवडणुकीत घाटगे यांचा पराभव झाला.

Samarjeet Ghatge
Samarjit Ghatge: मुश्रीफांविरोधात 'वस्तादा'ने मोठा डाव टाकलाच; फडणवीसांच्या विश्वासू नेत्यालाच पवारांनी 'कागल'च्या आखाड्यात उतरवलं!

सुरुवातीला घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पुणे म्हाडाचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले होते. त्यानंतर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले होते. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून घाटगे यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला रामराम केला.

राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या कोणत्याही राजकीय भूमिकेपासून ते अलिप्त आहेत. नुकताच त्यांचा वाढदिवस पार पडला. वाढदिवसाच्या निमित्ताने वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या होत्या.

Samarjeet Ghatge
Hasan Mushrif On Samarjit Ghatge : "पवारसाहेब आपसे बैर नही, समरजित तेरी खैर नही" मुश्रीफांचं खुलं चॅलेंज

मात्र या जाहिरातीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार किंवा राष्ट्रवादी संबंधित एकही नेत्यांचे फोटो या जाहिरातीमध्ये दिसले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप प्रवेशाची चर्चा जोरात होऊ लागली आहे. त्यांच्या राजकीय भूमिकेचे अनेक तर्क वितर्क लावले जात असून आगामी काळात त्यांची राजकीय भूमिका काय असणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com