Rahul Desai And Samarjitsinh Ghatge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : घाटगे-देसाईंच्या समर्थकांना नारळ, जिल्ह्यातील विविध समित्यांवरून दिला डच्चू

Samarjitsinh Ghatge and Rahul Desai : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला गळती लागल्याचे चित्र आहे. भाजपच्या आजी-माजी जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 10 Sep : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला गळती लागल्याचे चित्र आहे. भाजपच्या आजी-माजी जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatge) आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा देत पक्षाला रामराम केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांना ज्या पदावर जिल्हा नियोजन समितीच्या विविध पदावर विराजमान केले होते, त्या पदावरून डच्चू दिला आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून घाडगे आणि देसाई यांच्या समर्थकांना पाठवण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी भाजपच्या इतर कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. कागल (Kagal) तालुक्यातील सर्वसाधारण गटात अमर चौगुले, इतर मागास वर्गात अरुण गुरव, यांची नावे समरजित घाटगे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान समितीवर नियुक्ती केली होते.

त्यांना वगळून आता तानाजी कुरणे आणि शिवाजी मगदूम ही दोन भाजपची कार्यकर्ते या समितीवर नियुक्त झाले आहेत. गडहिंग्लज नियुक्ती समितीत वामन बिलावर यांना डच्चू देऊन संदीप नाथ बुवा यांना नियुक्त करण्यात आले आहे.

भुदरगडमधून ज्येष्ठ नागरिक यांच्यातून सुनील देसाई यांचे नाव राहुल देसाई यांनी सुचवले होते. आता त्यांच्या ऐवजी भाजपने देशभूषण तेली यांच्या नावाची नियुक्ती केली आहे. घाटगे आणि देसाई यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांना देखील विविध पदावरून पाय उतार व्हावे लागत आहे.

तेच नव्हे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील तालुकावार समितीवरून देखील घाटगे (Samarjitsinh Ghatge) आणि देसाई यांच्या समर्थकांना आता पायउतार व्हावे लागणार आहे. त्याबाबतच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT