Nagpur Hit and Run Case : नागपूर 'ऑडी'कारनामा; बावनकुळेंच्या मुलावर गंभीर आरोप; गृहमंत्री फडणवीसांचं मोठं विधान

Sanket Bawankule Audi Car Accident : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडी कारने काही गाड्यांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Nagpur Hit and Run Case, Sanket Bawankule, Devendra Fadnavis
Nagpur Hit and Run Case, Sanket Bawankule, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 10 Sep : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याच्या भरधाव ऑडी कारने काही गाड्यांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

या घटनेमुळे विरोधकांना भाजपवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर या घटनेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या पदावर राहण्यास लायक नसल्याचे म्हटलं आहे. तसंच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील गृहखात्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यामुळे या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता फडणवीस यांनी ऑडीकार प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "ऑडीकार प्रकरणातील पूर्ण चौकशी पोलिस करत आहेत. या घटनेतील सर्व तथ्य पोलिसांनी समोर आणले आहेत. मात्र, ज्या पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळेंना (Chandrashekhar Bawankule) धरून राजकारण केलं जात आहे, ते चुकीचं आहे." अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Nagpur Hit and Run Case, Sanket Bawankule, Devendra Fadnavis
Nagpur Hit and Run Case : पोलिस बावनकुळेंच्या मुलावर मेहेरबान; वैद्यकीय चाचणी न करताच सोडून दिले, मित्रांची मात्र चाचणी

शिवाय या प्रकरणावर त्यांनी मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पत्रकारांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्या संदर्भात प्रश्न विचारला असता, "आपण कुणाचं वक्तव्य ऐकलेलं नाही, त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणार नाही," असं म्हणत त्यावर बोलणं टाळलं.

तसंच यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरही भाष्य केलं. अनिल देशमुख सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. साबीआयने आता गुन्हा दाखल केला. तो त्यांचा प्रश्न आहे. सीबीआय स्वायत्त संस्था आहे.

Nagpur Hit and Run Case, Sanket Bawankule, Devendra Fadnavis
Mahavikas Aghadi on Bawankule: संकेत बावनकुळेच्या कार अपघात प्रकरणावर 'मविआ'तील तिन्ही पक्षांची वेगळी भूमिका!

गिरीश महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न

अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी अधिकाऱ्यावर दबाव टाकून गिरीश महाराजांना यांना अटक करण्यास सांगितले होते. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे सर्व पुरावे पोलिस अधीक्षकांकडे आहेत. सर्व नोंदी उपलब्ध आहेत. त्यानुसारच सीबीआयने कारवाई केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल. कुठलीही चूक नसताना गिरीश महाजन यांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी अनिल देशमुख यांनी महाजन यांची माफी मागितली पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com