Sushilkumar Shinde: सुशीलकुमार शिंदेंचं काँग्रेसला अडचणीत आणणारं विधान; '...तेव्हा काश्मीरला जाताना भीती वाटायची!

Congress Politics : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गांधी घराण्याचा प्रचंड विश्वास असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीवर आधारित पुस्तक लिहिले आहे. ‘पाच दशकांचे राजकारण’ या शिंदेंच्या आत्मचरित्राचं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पार पडला.
Sushil Kumar Shinde
Sushil Kumar ShindeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात पराभव स्विकारल्याानंतर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा ब्रेक लागला होता. काँग्रेस पक्षातही त्यांना थोडंसं साईडलाईन केल्याचं दिसून आलं होतं.

मात्र, प्रणिती शिंदेंनी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघ पुन्हा एकदा खेचून आणल्यामुळे सुशीलकुमार शिंदेंचंही (Sushilkumar Shinde) राजकीय वजन परत वाढलं आहे. पण आता त्यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे भाजपसह विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गांधी घराण्याचा प्रचंड विश्वास असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीवर आधारित पुस्तक लिहिले आहे. ‘पाच दशकांचे राजकारण’ या शिंदेंच्या आत्मचरित्राचं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी देशाचं गृहमंत्री पद सांभाळताना काश्मीरला गेल्यावर आपल्याला भीती वाटायची असं विधान केलं आहे.

एकीकडे मोदी सरकारने आपल्या दुसर्‍या दर्ममध्ये जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवले होते. आणि ते हटवल्यानंतर तिथे दहशतवादी हल्ले आणि फुटीरतावाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली होती. तसेच केंद्रातील मोदी सरकारकडून 370 कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आल्याचा दावाही केला जातो.

तर काँग्रेसकडून जम्मू काश्मीरमधील परिस्थिती जैसे थेच असल्याचा आरोप केला जातो. मात्र,आता सुशीलकुमार शिंदेंच्या या वक्तव्यानंतर आता भाजपच्या दाव्याला बळ मिळण्याची शक्यता आहे.

Sushil Kumar Shinde
Congress News : भाजपचे माजी आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार, प्रवेशाची तारीखही ठरली!

सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले?

काँग्रेसचे (Congress) नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले,‘मी देशाच्या गृहमंत्रीपदावर असताना जम्मू काश्मीरचा दौरा करण्यापूर्वी विजय धर यांच्याकडे जात असत.त्यांच्याकडून सल्ला घेत असायचो. इकडे तिकडे भटकू नकोस. तू लाल चौकात जा आणि तिथे भाषण कर असा सल्ला ते देत असत. याचवेळी ते मला तेथील काही लोकांना भेटून फिरायला जाण्यासही सांगत होते.

पण या सल्ल्यामुळे आपल्याला खूप प्रसिद्धी मिळाली.देशाचा गृहमंत्री निर्भीड आहे जो न घाबरता काश्मीरला जातो.पण मला खरंच भीती वाटायची.पण कोणाला सांगणार असंही आपल्या भाषणात शिंदे म्हणाले.

Sushil Kumar Shinde
Assembly Election : ‘हा’ सर्व्हे महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणार; ‘मविआ’ला पाच झोन मिळवून देणार सत्ता...

सुशीलकुमार शिंदे यांच्या यांनी सांगितलेल्या किस्स्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍यांमध्ये जोरदार हशा पिकला.आपल्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि आपली अडचण होण्याच्या शक्यतेने शिंदेंनी लगेच आपण हे तुम्हाला फक्त हसवण्यासाठी बोललो असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. एक माजी पोलीस अधिकारी असे बोलू शकत नाही”,असंही शिंदेंनी यावेळी सांगितले.

5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष स्वायत्तता देणारे कलम 370 रद्द केले. सरकारने जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्याचे विभाजन केले. काँग्रेस सरकारच्या काळात काश्मीरमध्ये दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना घडायच्या. पण आता भाजप सरकारच्या काळात काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे,असा दावा भाजपकडून केला जात आहे.

Sushil Kumar Shinde
Bihar Politics : बिहारच्या राजकारणात शाहरुख, अभिषेक बच्चनची एन्ट्री; प्रशांत किशोर यांची गुगली...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील सुधारलेल्या परिस्थितीवर भाष्य केले होते.ते म्हणाले होते, सामाजिकदृष्ट्या असुरक्षित गटांच्या हक्कांचे संरक्षण करणारी भारतीय राज्यघटना जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना पूर्णपणे लागू आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील महिला आज खेळापासून ते उद्योजकतेपर्यंत विविध क्षेत्रात उदयास येत आहेत. नवीन उद्योग सुरू होत आहेत. दहशतवादाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली आहे, तर पर्यटन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय कार्यक्रम जसे की G20 बैठका झाल्या आहेत, आणि जगाने या प्रदेशातील आदरातिथ्य आणि प्राचीन सौंदर्य पाहिले आहे, असं पीएम मोदी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com