Sambhaji Brigade sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Brigade : ''...तर कृषीमंत्री मुंडेंना घेराव घालणार'' ; करमाळ्यात संभाजी ब्रिगेडचा इशारा!

Agriculture Minister vs Sambhaji Brigade : केत्तूरच्या कृषी मंडल कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले.

Harshal Bagal

Karmala News : करमाळा विधानसभा मतदारसंघातील केत्तूर कृषी मंडल कार्यालय हे गेल्या दोन-अडीच वर्षापासून बंद असल्यामुळे स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे करमाळा संभाजी ब्रिगेडच्या वतीने केत्तूरच्या कृषी मंडल कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले. शिवाय कृषीमंत्री धनंजय मुंडे(DHANANJAY MUNDE) यांना घेराव घालण्याचा इशाराही दिला.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून कार्यालय बंद असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे. कार्यालयाला केत्तूर मंडल कार्यालय नावाची साधी पाटी सुद्धा नाही, केत्तूर मंडल येथील शेतकऱ्यांच्या आमच्याकडे वारंवार तक्रारी येत असल्याने आम्ही हे आंदोल केले असल्याचे संभाजी ब्रिगेडने सांगितलेे आहे. कृषी मंडल अधिकारी, सुपरवायझर, कृषी सहाय्यक हे कार्यालयात उपस्थित नसतात आणि ते बाहेरच्या जिल्ह्यात राहतात, असाही आरोप करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय ''करमाळा तालुक्यात चार कृषी मंडळ कार्यालय असून करमाळा, जेऊर, केत्तूर आणि केम हे कार्यालय तेथे नावापुरतेच आहेत. कारण सर्व अधिकारी त्यांची वैयक्तिक कामे, घरगुती कामे करत बसतात व कार्यालयाच्या ठिकाणी कधीच उपस्थित नसतात. तरी सर्व अधिकाऱ्याने कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवाव्यात.'' असे सांगण्यात आले आहे.

याचबरोबर ''ज्या काही शासकीय योजना आहेत त्यांची शेतकऱ्यांना बांधावर जाऊन व चावडी वाचन करून माहिती द्यावी. तसेच ऑनफिल्ड अधिकारी उपस्थित न राहिल्यास राहिल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना घेराव घालून त्याचा जाब विचारला जाईल.'' असा इशारा करमाळा संभाजी ब्रिगेड च्या वतीने दिला आहे.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT