Sharad Pawar Certificate : पवारांच्या मदतीला संभाजी ब्रिगेड; सोशल मीडियातून फिरणाऱ्या ओबीसी दाखल्याचा केला पर्दाफाश

Sambhaji Brigade : स्वतःला लेखक, इतिहासकार समजतात आणि जिजाऊंचे वंशज असल्याचे खोटे सांगतात. त्या खोट्या वंशजांनी शरद पवार यांचे कुठले तरी खोटे सर्टिफिकेट मिळविले.
Sharad Pawar Certificate
Sharad Pawar CertificateSarkarnama

Pune News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेला दाखला खोटा आहे. त्यांच्याबाबत माहिती खोटी पसरवून पवारांना बदनाम करण्याचं षडयंत्र सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी नागपूर सेंटरकडून व्हिटॅमिन पुरवलं जातंय. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, सामाजिक स्थैर्य सांभाळण्याची ज्यांची जबाबदारी आहे. तेच राज्यात अस्थिरता निर्माण करून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी नाव न घेता भाजप आणि संघावर केला. (Sharad Pawar's OBC certificate going viral on social media is fake: Vikas Pasalkar)

शरद पवार यांचा ओबीसी असा उल्लेख असलेला दाखला काही दिवसांपासून नामदेव जाधव हे माध्यमांपुढे येऊन सांगत आहेत. त्याबाबत पासलकर यांनी जाधव यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडले. स्वतःला लेखक, इतिहासकार समजतात आणि जिजाऊंचे वंशज असल्याचे खोटे सांगतात. त्या खोट्या वंशजांनी शरद पवार यांचे कुठले तरी खोटे सर्टिफिकेट मिळविले. त्या सर्टिफिकेटवर पवारांचा उल्लेख ओबीसी असा करण्यात आल्याचे दाखवले. पण ते चुकीचं सर्टिफिकेट आहे, असे उत्तर पासलकर यांनी जाधवांना दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar Certificate
Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांचे मोठे विधान; ‘जनतेला अन्‌ कायद्याला अपेक्षित निर्णय देणार’

देशात आणि राज्यात घडलेल्या घटनेचे केंद्रबिंदू हे शरद पवारच राहतात. अलिकडच्या काळात त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. त्या टीकाकरांना कोणीतरी पुरस्कृत करतंय. त्यांच्याबाबत खोटी माहिती देऊन पवारांना बदनाम करण्याचं षडयंत्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. मात्र, पवारांच्या शाळेच्या दाखल्यावर मराठा असा उल्लेख आहे. निवडणूक आयोगाकडेही त्यांची मराठा म्हणूनच नोंद आहे. कारण, त्यांनी कुणबी असं सर्टिफिकेट घेतलेले नाही. त्यांचं प्रोफेशन हे राजकारण असं दाखवलं आहे. पण त्यांचं निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रोफेशनमध्ये ॲग्रीकल्चर असा उल्लेख आहे, असेही पासलकर यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या सर्टिफिकेटबाबत बोलताना पासलकर यांनी सांगितले की, पवारांसारख्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय. राज्यात असे जे षडयंत्रकारी लोकं आहेत, त्यांना कुठूनतरी रसद पुरवली जाते. ते ओबीसी नसल्याचे आमच्याकडे धडधडीत पुरावा आहे. त्यांचं शिक्षण बारामती, प्रवरानगरमध्ये झाले आहे.

Sharad Pawar Certificate
Jalgaon Politics : माजी खासदार ए. टी. पाटलांवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; पाच वर्षांनंतर सक्रीय

राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. सामाजिकदृष्ट्या एखाद्या नेतृत्वाला बदनाम केलं जातं. पवारांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजकारण आणि राजकारण केलेलं आहे. त्यांनी सर्व समाजाला एकत्र करण्याचे आणि न्याय देण्याचे काम केलेले आहे. पण, पवारांची जातच बदलून टाकणे, त्यांना ओबीसींमध्ये टाकणे हे अत्यंत चुकीचे आहे.

Sharad Pawar Certificate
One Crore Bribery Case : एक कोटी लाच प्रकरण; ‘वाघ’च्या शोधासाठी ‘लाचलुचपत’चे पथक ऐन दिवाळीत ‘ऑन ड्यूटी’

गेल्या दोन दिवसांपासून जाणून बुजून पवारांचं खोटं सर्टिफिकेट व्हायरल करण्यात येत आहे. अनेक विषय शरद पवारांच्या नावाला चिटकवले जातात आणि त्यांना बदनाम केलं जातं. हा षडयंत्राचा भाग आहे. हा गेली कित्येक वर्षांपासून चालू आहे. पण सामाजिकदृष्ट्या विषय येतो, तेव्हा आम्हाला राजकारणाच्या पलिकडे पाहून खोलात जावं लागलं आणि शोधावं लागतं. एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करताना कुठून व्हिटॅमिन पुरवलं जातं तर हे सर्व नागपूर सेंटरकडून घडतंय, असा आरोपही त्यांनी केला.

Sharad Pawar Certificate
Amit Thackeray Adopted village : अमित ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत घेतली विकासासाठी दत्तक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com