Sangli Police Sambhaji Maharaj Statue sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Maharaj Statue : सांगलीत पहाटे संभाजी महाराजांचा पुतळा उभारला, पोलिसांचा हस्तक्षेप

Sangli Police Sambhaji Maharaj Statue : राम मंदीर चौकात शनिवारी पहाटे साडेचार वाजता विना परवानगी संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

Sangli News : राम मंदिर चौकामध्ये विना परवानगी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आज पहाटे साडेचारच्या सुमारास उभारण्यात आला आहे. महानगरपालिकेतर्फे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्रिकोणी बागेत बसवण्याचे नियोजन होते.

आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते रविवारी त्रिकोणी बागेत भूमिपूजन होणार होते. त्यापूर्वीच काही कार्यकर्त्यांनी राम मंदिर चौकात संभाजी महाराजांचा पुतळा चौथऱ्यावर बसवला. मात्र, पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलिसांनी हा पुतळा तेथून हलवला आहे.

राम मंदीर चौकात शनिवारी पहाटे साडेचार वाजता शिवतेज सावंत, आदित्य नाईक, आशिष खिचडे, अमित पाटील, सुजल कांबळे, राहुल माने, ऋषिकेश भोई अशा ६०-७० जणांनी एकत्रित येऊन हा पुतळा उभारला.

शिवतेज सावंत, आदित्य नाईक यांच्यासह पुतळा उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी सांगितले की, 'छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याबाबत १६ ते १७ वेळा आंदोलने केली. अनेकदा निवेदन दिली. यानंतर प्रतापसिंह उद्यान पुतळा बसवण्याचे मनपाने मान्य देखील केले. त्यानंतर अचानक त्रिकोणी बागेत पुतळा बसवण्याबाबत ठराव घेण्यात आला. ज्यांनी पुतळ्यासाठी पाठपुरावा केला, त्यांना विचारात न घेता ठिकाण जाहीर केले. रणभूमीत लढलेल्या योद्धाचा पुतळा बागेत बसवणे, हे आम्हाला मान्य नव्हते.'

'सिव्हील हॉस्पिटल, बस स्थानकाकडे जाणारा हा मार्ग असल्याने याठिकाणी प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे आम्हाला छत्रपती संभाजीराजेंचा सण देखील योग्य पद्धतीने साजरा करता येणार नाही, ही खंत मनात होती. म्हणून याठिकाणी पुतळा बसवला. काही नेत्यांच्या हट्टापायी त्रिकोणी बागेत पुतळा बसवण्याचा घाट घातला जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा भव्य पद्धतीने उभारण्यात यावा.' अशी आमची मागणी आहे असे देखील त्यांनी सांगितले.

11 वाजता बैठक होणार

पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव म्हणाले, राम मंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारला असल्याचे पाच वाजून दहा मिनिटांनी गुड मॉर्निंग पथकाच्या निदर्शनास आले. डीवायएसपी संदीप भागवत यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना घटनास्थळी बोलवून घेतले. चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर सकाळी ६.४० ला संबंधितांनीच पुतळा काढून घेतला. या संदर्भात सकाळी ११ वाजता मनपामध्ये बैठक होणार आहे.

विश्रामबाग पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन यासह मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT