Maharashtra Revenue Department : खुशखबर! महसूलचा आकृतिबंध मंजूर, मंत्री बावनकुळेंच्या खात्यात 35 हजार 876 पदांची भर

Revenue Minister Chandrashekhar Bawankule announced the creation of 35,876 posts in Maharashtra Revenue Department during a statement in Nagpur : राज्य सरकारने महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर केल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Maharashtra Revenue Department
Maharashtra Revenue DepartmentSarkrnama
Published on
Updated on

Maharashtra Revenue Department jobs : राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाने महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर केला आहे.

तब्बल 35 हजार 876 पदांची निर्मिती करण्यात आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक बळकट होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी, महसूल विभागातील मोठ्या प्रशासकीय बदलांची घोषणा केली. महसूल विभागाचा शेवटचा आकृतिबंध 2006 मध्ये मंजूर झाला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी नव्या आकृतिबंधासाठी अनेक आंदोलने केली होती. अखेर शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला.

750 अधिकाऱ्यांना पदोन्नती

या निर्णयामुळे राज्यात 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये, 8 नवीन उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालये, 2 नवीन तहसीलदार कार्यालये आणि 69 अप्पर तहसीलदार कार्यालये सुरू होणार आहेत. विकास प्रक्रियेत प्रशासकीय (Revenue Department) सुधारणा अत्यंत महत्त्वाची असते आणि आम्ही ती करून दाखवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच या वर्षी सुमारे 750 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Revenue Department
Maharashtra Recruitment : सरनाईक-पाटलांचा मोठा निर्णय! भरतीचा पेटारा उघडला; इच्छुकांनी तयारीला लागा

बारामती बिनविरोध व्हावी

मंत्री बावनकुळे यांनी, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. अजित पवार यांचे सर्वच राजकीय पक्षांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि त्यांचे नेतृत्व लक्षात घेता, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि रासप या पक्षांनी बारामती विधानसभा मतदारसंघात उमेदवार देऊ नये. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे म्हटले.

Maharashtra Revenue Department
Rahuri Bypoll : राहुरीत काँग्रेसचाच झेंडा? थोरातांच्या कॉन्फिडेंटने मविआत खळबळ!

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर बोलताना त्यांनी सांगितले की, याबाबतचा जो काही अंतिम निर्णय असेल तो पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच घेतील.

जिल्हाधिकाऱ्यांचा ‘डान्स’, कारवाई होणार

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘डान्स’ प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यासह राज्यातील अल्पसंख्याक बोगस शाळांवर कडक कारवाई केली जाईल आणि बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com