Satyajit Deshmukh, Mansingrao Naik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Political News : राष्ट्रवादीचे 'नाईक' आणि भाजपचे 'देशमुख' यांच्यात 'कलगीतुरा'...

Umesh Bambare-Patil

Sangali political news : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांना छप्पर फाडके निधी दिला जात आहे. शिराळ्याचे राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांना मंजूर झालेल्या 43 कोटींच्या निधीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये श्रेयवादाची ठिणगी पडली आहे.

भाजप नेते व जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख Satyajit Deshmukh यांनी माझ्यामुळे हा निधी मंजूर झाल्याचे सांगत आमदार मानसिंगराव नाईक Mansingrao Naik यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे निधी मंजुरीवरून आमदार नाईक आणि भाजपचे देशमुख यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आमदार आपापल्या मतदारसंघाला जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पण सांगलीत मात्र राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांत निधी आणण्यावरून कलगीतुरा रंगला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या देशमुखांवर सडेतोड टीका केली आहे. ते म्हणाले, सत्यजित देशमुख यांनी खोटे बोलून शिराळा Shirala विधानसभा मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करू नये. करंजवडे, चिकुर्डे रस्त्याच्या कामाचे दोन कोटींचे पत्र दिले असे ते म्हणतात.

मग दोन कोटींच्या कामाला पाच कोटी कसे मिळाले, याचा विचार करावा. या रस्त्याच्या कामासाठी मीच पत्र दिल्याने रस्त्याला पाच कोटी मंजूर झाले. विधानसभा अधिवेशनात आमदारांच्या पत्राचा प्रथम विचार केला जातो. तुम्ही आदी आमदार व्हा, मग पत्र द्या, असा टोला आमदार नाईक यांनी देशमुख यांना लगावला. ते म्हणाले, चिखली येथे शिराळा विधानसभा मतदारसंघातील आमदार नाईक यांनी सुचविलेल्या 42 कोटी 89 लाख 62 हजार 672 कोटींच्या कामांना नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळाली.

काम आणि मंजूर निधी याबाबत दिलेली माहिती अशी आहे. पेठ, महादेववाडी, माणिकवाडी, काळमवाडी, वाटेगाव, सुरुल बेलदारवाडी रस्ता सुधारणा अंदाजे दहा कोटी. उरुण इस्लामपूर राज्य मार्ग 152 ते लाडेगाव 2 वशी, कुरळप रस्ता 13 कि.मी. सुधारणा 5कोटी. (वाघवाडी ते कुरळप) करंजवडे चिकुर्डे रस्ता ग्रा.मा.क्र. 10 कि. मी रस्ता सुधारणा व लहान पुलांचे बांधकाम 5 कोटी.

माझ्यामुळे पंधरा कोटी मंजूर : सत्यजित देशमुख

विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पूल कामांसाठी राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यावर चार पूल व दोन रस्ते अशी सहा कामे मंजूर झाली आहेत. ही माहिती भाजपचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. राज्य सरकारने शिराळा येथे महत्त्वाच्या व्यक्तींसाठी शासकीय विश्रामगृहासाठी दोन कोटी 22 लाख 50 हजार मंजूर झालेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य विशेष सहकार्यातून करुंगली येथे वारणा नदी व संरक्षण भिंत बांधण्यासाठी 67 लाख 12 हजार मंजूर झालेत.

कामाचे नाव व मंजूर निधी असा : रस्ते व पूल वाकूर्डे बुद्रुक, पडवळवाडी, रस्ता ग्रा. मा क्रमांक 86 वर लहान मुलाचे बांधकाम करणे. रस्ता मजबुतीकरण दोन कोटी. येळापूर समता नगर, दीपक वाडी रस्ता ग्रामीण क्रमांक 118 मेणी ओढ्यावर लहान पूल व रस्ता मजबुतीकरण दोन कोटी.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT