Kolhapur Political News : आरक्षण हवे असेल तर मराठा समाजाने 'लंगोट' घालून राहिले पाहिजे, अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रकाश शेंडगे यांना कोल्हापुरातील मराठा समाजाने धोबीपछाड केले. त्यांच्या प्रतिकात्मक पैलवानाला भर दसरा चौकातच कुस्तीत 'चारीमुंड्या चीत' करून आसमान दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला.
मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण हवे असेल तर मराठा समाजाने दहा वर्षे लंगोट लावून राहिले पाहिजे, असे वक्तव्य प्रकाश शेंडगे Prakash Shendage यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला. शनिवारी कोल्हापूर Kolhapur येथील दसरा चौकात समाजाच्या पैलवानाने लंगोट घालून मुखवटादारी शेंडगे यांना चितपट करण्याचे अनोखे आंदोलन केले.
मराठा समाजाबद्दल अपशब्द वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या प्रकाश शेंडगे यांचा अनोखा निषेध कोल्हापुरातील सकल मराठा समाजाकडून करण्यात आला. भर दसरा चौकात प्रतिकात्मक स्वरूपात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना पैलवान बनवून कुस्ती खेळवण्यात आली. या कुस्तीत शेंडगे यांच्या चारीमुंड्या चीत करून त्यांचा निषेध व्यक्त केला. या अनोख्या आंदोलनाची चर्चा राज्यात सुरू आहे.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर शुक्रवारी टीका केली होती. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हवं असेल तर लंगोट घालणार का? हातामध्ये वस्तरा घेणार का? असे सवाल प्रकाश शेंडगे यांनी केले होते. कुणबी म्हणजे सामाजिक मागासलेले आहेत. यांचं कुणीही लंगोटी घालून फिरत नाही.
तुम्ही आताही कोकणात गेलात तर आजही कोकणात कुणबी लंगोटी घालून फिरताना दिसेल. मग हे लंगोट घालायला तयार आहेत का? असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केला होता. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना आमदारकीची हाव सुटली आहे. आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या शेंडगे यांनी भान ठेवून वक्तव्य करावीत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांची ही वक्तव्यं असून, कोणाचे तरी तळवे चाटत असे वक्तव्य त्यांनी केले आहे, अशा शब्दांत सकल मराठा समाजाचे बाबा इंदुलकर यांनी टीका केली आहे.
Edited By : Amol Sutar
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.