Vishal Patil, Vishwajeet Kadam  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : "मी कुणाच्या बापाला भीत नाही, बंटी पाटलांसारखं वागलो तर..."; विश्वजीत कदमांचा भरसभेत राष्ट्रवादीच्या नेत्याला इशारा

Sangli Assembly Election 2024 : 'मी अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मजयश्री पाटील याच मविआच्या अधिकृत उमेदवार आहेत'; अशी भूमिका विशाल पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये विशाल पाटलामुळे विश्वजीत कदमांच्या भूमिकेबद्दलही मनात संशय आहे.

Jagdish Patil

Sangli Assembly Election 2024 : "बंटी पाटलांसारखं जर मी वागायला लागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही", अशा शब्दात काँग्रेस नेते आणि पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्यांना इशारा दिला आहे.

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून राज्यभरात 'सांगली पॅटर्न'ची (Sangli Pattern) जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभेनंतर विधानसभेलाही सांगलीत असाच काहीसा पॅटर्न सुरू आहे. मात्र, यावेळी लोकसभेला विशाल पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले विश्वजीत कदम काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) यांचा प्रचार करत आहेत.

तर सांगली पॅटर्नमुळे लोकसभेला निवडून आलेले आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेले खासदार विशाल पाटील हे विश्वजीत कदमांच्या (Vishwajeet Kadam) भूमिकेत असून त्यांनी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांना उघड पाठिंबा दिला आहे. जयश्री पाटील या विशाल पाटलांच्या वहिनी आहेत.

सांगलीत सध्या काँग्रेसचे (Congress) अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात भाजपचे सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) हे रिंगणात आहेत. मात्र काँग्रेस नेत्या जयश्री पाटील या अपक्ष म्हणून इथून निवडणूक लढवत असून विशाल पाटलांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. 'मी अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे जयश्री पाटील याच मविआच्या (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार आहेत'; अशी भूमिका विशाल पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये विशाल पाटलामुळे विश्वजीत कदमांच्या भूमिकेबद्दलही मनात संशय आहे. शिवाय जयश्री पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील हे आघाडी धर्म पाळून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करणार का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

विश्वजीत कदम हे पृथ्वीराज पाटलांसाठी ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विशाल पाटील यांच्या गैरहजेरीवरून आणि वसंतदादा घराण्याच्या भूमिकेवरून विश्वजीत कदमांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशातच नांद्रे येथील पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या भाषणातून कदमांना डिवचण्यचा प्रयत्न केला.

यानंतर आक्रमक झालेल्या कदम यांनी त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांला 'तुम्हाला बंटी पाटलांचं कौतुक करायचं असेल आणि जर मी बंटी पाटलांसारखं वागायला लागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही', असा इशारा दिला आहे. या सभेत बोलताना विश्वजीत कदम राष्ट्रवादीच्या नेत्याला उद्देशून म्हणाले, "कुठं काय बोलायचं याचं भान ठेवलं पाहिजे. लोकसभेबाबत बोलत असाल तर मलाही खूप काही बोलता येईल.

लोकसभेमध्ये आम्ही काँग्रेसच्या विचाराचा खासदार निवडून आणला आहे. विधानसभेत त्यांची भूमिका काय आहे, याच्याशी मला देणंघेणं नाही. आता मी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करत आहे. लोकसभेला कुणी काय केलं हे जर बोलायचं असेल तर मीही खूप काही बोलू शकतो. पण तुम्हाला ते पचणार असेल तर मी बोलतो. कारण मला कोणाच्या बापाची भीती नाही. मी स्वयंभू आहे. माझे वडील शून्यातून निर्माण झाले आहेत.

माझ्या मतदारसंघात माझे गड मजबूत आहेत. जर बंटी पाटलांचं कौतुक करायचं असेल आणि मी बंटी पाटलांसारखं वागायला लागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही. मी प्रामाणिकपणे सांगली विधानसभेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. पुढचं घराणंसुद्धा प्रतिष्ठित घराणं आहे. जे सांगलीच्या हिताचं आहे ते जनता निर्णय घेईल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT