Sangli News, 08 Jul : विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर सांगली मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या नोकर भरतीवरून राजकारण तापले आहे. विधानपरिषद आणि आगामी जिल्हा बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारच्या सहकार विभागाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती दिली होती.
या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. मात्र, सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल केली होती. यावेळी न्यायालयाने आमदार पडळकर आणि खोत यांना दणका दिला आहे.
मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आमदार पडळकर आणि आमदार खोत यांचे मनसुबे उधळले आहेत. सहकार विभागाकडून नोकर भरतीला स्थगिती दिल्यानंतर माजी आमदार नाईक यांनी कोल्हापूर सर्किट येथे याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने स्थगिती उठवताना सरकारला 15 दिवसाची म्हणणे मांडण्यासाठी मुदत दिली आहे. सांगली मध्यवर्ती जिल्हा बँकेकडून जवळपास 444 कनिष्ठ लिपिक पदाची नोकरभरती केली जाणार आहे. त्याला सहकार विभागाकडून मागील आठवड्यात स्थगिती देण्यात आली होती. न्यायालयाकडून स्थगिती उठवल्याने नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सहकार विभागाकडून देण्यात आलेल्या स्थगिती मागे राजकीय हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे. बँकेवर प्रशासक आणण्याच्या हालचाली भाजपच्या नेत्यांकडून सुरू असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला होता. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी नोकर भरती वरून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन जुलै रोजी स्थगिती देण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.