Katraj Dairy : ‘कात्रज’चा कारभार वादात : बोगस संस्था अन्‌ कोट्यवधींच्या उधळपट्टीची 2 महिन्यांत चौकशी; मंत्र्यांची घोषणा

Atul Save announcment : कात्रज डेअरीतील कथित आर्थिक गैरव्यवहार, बोगस दूध संस्था आणि निधीच्या उधळपट्टीचा मुद्दा विधानमंडळात उपस्थित झाला. मंत्री अतुल सावे यांनी दोन महिन्यांत चौकशीचे आश्वासन दिले.
Katraj Dairy
Katraj DairySarkarnama
Published on
Updated on

Pune, 07 July : सहकारी क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात म्हणजेच कात्रज डेअरी सध्या 'दूध का दूध, पाणी का पाणी' होण्याची वेळ आली आहे. संघातील कथित आर्थिक गैरव्यवहार, बोगस दूध संस्थांचे पेव आणि निधीच्या उधळपट्टीचा मुद्दा भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी विधीमंडळात ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून मांडला. त्यावर दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी येत्या दोन महिन्यांत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

आमदार योगेश टिळेकर यांनी विधान परिषदेत आक्रमक पवित्रा घेत कात्रज डेअरीच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. संघामध्ये केवळ कागदावर चालणाऱ्या बोगस दूध संस्था, बनावट वाहतूक देयके (ट्रान्सपोर्ट बिले), खोट्या नोंदी आणि उपविधींचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

एवढ्यावरच न थांबता कोंढापुरी येथील पशुखाद्य कारखान्यातील संशयास्पद खरेदी, नवीन डेअरी प्रकल्पाच्या नावाखाली सल्लागारावर झालेली सुमारे एक कोटी रुपयांची उधळपट्टी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेवर झालेला अवास्तव खर्च या मुद्द्यांकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

टिळेकर यांनी या संपूर्ण घोटाळ्याची 'विशेष तपास पथका' मार्फत चौकशी होणार का? बोगस दूध संस्थांची मान्यता तातडीने रद्द करणार का? आणि मागील ५ वर्षांचे विशेष ऑडिट करून सहकार आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा चौकशीत समावेश करणार का? असा सवाल उपस्थित केला.

Katraj Dairy
Ram Kadam : माझी आई 15-15 मिनिटे सलग खोकायची, खोकता खोकता बेशुद्ध व्हायची : राम कदमांनी सांगितलं कबुतरांमुळे होणाऱ्या आजाराचे भयाण वास्तव...

यावर दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सरकारची बाजू मांडली. येत्या १० आणि ११ जून रोजी स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून, दोन महिन्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

Katraj Dairy
Sangli Politic's : तानाजी पाटलांना अवघ्या महिनाभरातच मिळाली विधान परिषदेतील माघारीची बक्षिसी; चंद्रकांतदादांकडून मित्रपक्षाचा सन्मान

दूध भेसळ आणि बोगस संस्थांच्या मुळाशी जाण्यासाठी आवश्यक पडल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचाही समितीत समावेश केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अहवाल हाती येताच दोषींवर कोणतीही दिरंगाई न करता थेट आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सावे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com