सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या (Sangli DCC) पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात लढत निश्चित झाली आहे. भाजपचे खासदार व विद्यमान संचालक संजयकाका पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच निवडणुकीसाठी आटपाडीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी मारामारी झाली होती. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती.
भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत संजयकाका हेच नसल्याने महाविकास आघाडीचा विश्वास वाढला आहे. संजयकाका पाटिल यांच्या वडिलांचे काल निधन झाल्याने त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असावी, असे सांगण्यात येते.
21 जागांच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. 316 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारीसाठी आज गर्दी झाली होती. अर्ज माघारीनंतर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, काॅंग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध झाले.
महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल असे : सोसायटी गट :
आटपाडी- तानाजी पाटील, कवठेमहांकाळ - अजितराव घोरपडे, खानापूर- अनिल बाबर, पलुस- महेंद्र लाड, कडेगाव-मोहनराव कदम, वाळवा- दिलीप पाटील, शिराळा- मानसिंगराव नाईक, मिरज- विशाल पाटील, जत-विक्रम सावंत, तासगाव- बी. एस. पाटील. महिला राखीव- जयश्री मदन पाटील, अनिता विजय सगरे. अनुसूचित जाती जमाती-बाळासाहेब होनमोरे, ओबीसी-मन्सुर खतीब, विमुक्त जाती व भटक्या जमाती-राजेंद्र डांगे, इतर सहकारी संस्था- वैभव शिंदे, प्रक्रिया संस्था-सुरेश पाटील, पतसंस्था गट- किरण लाड, पृथ्वीराज पाटील, मजूर संस्था-हणमंतराव देशमुख, सुनील ताटे. महाआघाडीचे पॅनेल निश्चित केल्यानंतर भाजपाची यादी उशिरापर्यंत जाहीर नव्हती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.