पडळकरांना बरेवाईट झाल्यास राष्ट्रवादीचे नेते जबाबदार : खोतांनी टाकली ठिणगी

सांगली जिल्हा बॅंकेच्या वादातून सांगलीत पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला.
Sadabahu Khot-Padlkar
Sadabahu Khot-Padlkar Sarkarnama

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्यातील वाद आता वाढला आहे. या वादात आता दुसरे आमदार सदाभाऊ खोत यांनी उडी घेती आहे. पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीकडून सतत हल्ले होत आहेत, असे म्हणत त्यांच्या जीवितालाही काही बरेवाईट झाले तर राष्ट्रवादी आणि त्यांचे नेते जबाबदारी असतील, असा इशारा खोत यांनी दिला.

आटपाडी येथे पडळकर यांच्या गाडीवर रविवारी हल्ला झाला. त्यात काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. तेव्हापासून वातावरण पुन्हा तापले आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. खोत यांनी राज्य शासनाला आणि राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

Sadabahu Khot-Padlkar
गोपीचंद पडळकर गट अन् शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटात जोरदार राडा

ते म्हणाले, ‘‘गोपीचंद पडळकर हे सामान्य कुटुंबातून आलेले नेतृत्व आहे. बहुजनांचे ते नेते आहेत. राष्ट्रवादीकडून सतत त्यांच्यावर हल्ले होत आहेत. कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढत आहेत. त्यांचे आव्हान रोखण्याचे काम विरोधक चुकीच्या पद्धतीने करत आहेत. राज्य शासनाला मी सूचित करतो, असे हल्ले होत राहिले तर बहुजन समाज हात बांधून बसणार नाही. तो रस्त्यावर उतरेल. तुमच्या हल्ल्यांचा प्रतिकार करेल. गोपीचंद यांच्या जीवाला काही बरवाईट झाले तर राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे नेते जबाबदार असतील. राज्य शासनाने गोपीचंद यांना सुरक्षा पुरवावी. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी.’’

Sadabahu Khot-Padlkar
... तर सहकारमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करु : सदाभाऊ खोत यांचा इशारा

काय झाले होते आटपाडीत?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मतदाराच्या नातेवाईकाला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी पंचायत समिती आवारात मारहाण केल्याच्या रागातून व पर्ववैमनस्यातून भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी समर्थकांत राडा झाला.

पडळकर गटातील गाड्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव राजू जानकर (भेंडवडे, ता. खानापूर) व शिवसेनेचे बाळू मेटकरी (निंबवडे) यांना उडवल्याचे समजते. त्यानंतर शिवसेना समर्थकांनी आमदार गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर व समर्थकांच्या गाडीवर दगडफेक केली. रात्री उशिरापर्यंत आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

जिल्हा बँकेची निवडणूक लागली आहे. भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांच्यात तालुक्यात चुरस आहे. मेटकरवाडी सोसायटीचा मतदानाचा ठराव भाजपचे बाळासाहेब बरकडे यांच्या नावे झाला आहे. ते शिवसेनेला मिळाले आहेत. त्यामुळे भाजप गटात राग होता. त्यातूनच राजू जानकर यांच्या पाहुण्यांना पंचायत समिती आवारात दुपारी पडळकर समर्थकांनी दमदाटी केली. त्याची माहिती जानकर यांना यांना समजली. त्यावरून ते आणि पडळकर यांच्यात दूरध्वनीवरून शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे ते अण्णाभाऊ साठे चौकात आले होते. तेथेच शिवसेनेचे समर्थक कार्यकर्ते जमले होते. आमदार गोपीचंद पडळकर, समाज कल्याणचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर आणि समर्थकांच्या गाड्या चौकात आल्यावर शिवसेना समर्थकांनी गाडीवर दगडफेक केली.

Sadabahu Khot-Padlkar
पंतप्रधान मोदी भाषण देऊन आले तिथं आदित्य ठाकरेंनी पुरस्कार स्वीकारलाय...

पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील तेथेच उपस्थित होते. दोन्ही बाजूकडून राडा सुरू झाला. राष्ट्रवादीचे भेंडवडेचे राजू जानकर यांच्यासह दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार जानकर यांनी केली आहे. पडळकर बंधू आणि समर्थकांच्या गाड्यांवर दगडफेक झाली. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. घटनास्थळी जमावाने गर्दी केली होती. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोठा बंदोबस्त तैनात केला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांच्या तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com