Sangli District Bank Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli District Bank News : 'गोकुळ'नंतर सांगली जिल्हा बँकेतही भाजपची तिरकी चाल; जयंत पाटील यांना धक्का? चंद्रकांतदादांनी दिले स्पष्ट संकेत...

Sangli District Cooperative Bank Election News, Chandrakant Patil, Jayant Patil : अध्यक्षपद महायुतीच्या माध्यमातून किंवा नव्या फॉर्म्युल्याने ठरेल, पण भाजपची भूमिका महत्त्वाची राहील, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Rajanand More

Sangli News : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर वर्चस्व मिळविण्यासाठी महायुती सरकारने चार शासननियुक्त सदस्यांना मतदाना अधिकार देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयावर कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यास काँग्रेस नेते सतेज पाटील यांना बहुमत असून हादरा बसणार आहे. आता सांगली जिल्हा बँकेतही अशीच आणीबाणी निर्माण झाली आहे.

सांगली बँकेत महाविकास आघाडी आणि महायुतीला प्रत्येकी १० जागा मिळाल्या आहेत. तरे संजयकाका पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या भूमिकेवरच बँकेवर सत्ता कुणाची असणार, हे ठरणार आहे. त्यामुळे सध्यातरी पेच निर्माण झाला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र संजयकाका आमचेच आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे टेन्शन वाढविले आहे.

एवढेच नाही तर बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपचाच निर्णय अंतिम राहणार, अशी ठाम भूमिकाही चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. अध्यक्षपद महायुतीच्या माध्यमातून किंवा नव्या फॉर्म्युल्याने ठरेल, पण भाजपची भूमिका महत्त्वाची राहील, असं त्यांनी स्पष्ट केले आहे. बँकेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केल्याचं सांगतानाच, आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सर्व पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा, असंही आवाहनही त्यांनी केले आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी बँकेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी आपण प्रयत्न केल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचाच परिणाम म्हणून २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या, तर सहा जागांसाठी निवडणूक झाली. आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून समन्वयाने निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस सहा जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल भाजपला पाच तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आहेत. सर्वाधिक जागा असलेल्या काँग्रेस अध्यक्षपदावर दावा सांगत आहे. तर दुसरीकडे भाजपनेही अध्यक्षपदासाठी कंबर कसल्याचे दिसते. संजयकाकांचा पाठिंबा भाजपला मिळाल्यास याच पक्षाचा अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे. आता या पेचातून कसा मार्ग काढला जाणार की पुन्हा महायुती विरुध्द महाविकास आघाडी असे फटाके फुटणार, हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT