CM bypoll defeat : पोटनिवडणुकीत पराभव अन् थेट मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; देशात पहिल्यांदाच असं घडलं, ऐतिहासिक निवडणुकीची कहाणी...

Tribhuvan Narayan Singh, UP Chief Minister, Chief Minister bypoll defeat : उत्तर प्रदेशात १९६९ मध्ये काँग्रेसचे चंद्रभानू गुप्ता यांनी चौधरी चरण सिंह यांच्यासाठी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चरण सिंह हे जवळपास सात महिने या पदावर राहिले.
Tribhuvan Narayan Singh
Tribhuvan Narayan SinghSarkarnama
Published on: 
Updated on: 

Uttar Pradesh political history : उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा हॅटट्रिक करण्यासाठी कंबर कसली आहे. विरोधकांनीही आक्रमकपणे भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता संपूर्ण देशाला आहे. निवडणुकीत इतिहास घडेल ना घडेल, पण यापूर्वी देशातील सर्वात मोठ्या राज्यात अनेक निवडणुका ऐतिहासिक ठरल्या आहेत. पोटनिवडणुकीत पराभूत झाल्याने मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागल्याची घडामोडही याच राज्याने पाहिली आहे.

विधानसभा किंवा विधानपरिषदेचा सदस्य नसलेला व्यक्तीही मंत्री किंवा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेऊ शकतो. पण त्यांना सहा महिन्यांत एखाद्या सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येणे बंधनकारक असते. अन्यथा त्यांचे पद जाते. काँग्रेस नेते त्रिभुवन नारायण सिंह यांनाही मुख्यमंत्रि‍पदाची लॉटरी लागली होती. ते १९५२ आणि १९५ मध्ये चंदौली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढले होते. त्यांनी समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचा पराभव केला होता. ते केंद्रात मंत्रीही होते.

उत्तर प्रदेशात १९६९ मध्ये काँग्रेसचे चंद्रभानू गुप्ता यांनी चौधरी चरण सिंह यांच्यासाठी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चरण सिंह हे जवळपास सात महिने या पदावर राहिले. पण सरकार अल्पमतात आल्याने राज्यपालांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. राज्यातील १७ दिवसांच्या राष्ट्रपती राजवटीनंतर विविध पक्षांच्या पाठिंब्यानंतर त्रिभुवन नारायण सिंह यांनी १८ ऑक्टोबर १९७० मध्ये मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यावेळी ते राज्यसभेचे सदस्य होते.

Tribhuvan Narayan Singh
Gokul chairman election : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सतेज पाटलांसाठी पहिला आशेचा किरण; गुजरात हायकोर्टाचा एक निकाल ठरणार गेमचेंजर?

त्रिभुवन यांना भारतीय जनसंघ, स्वतंत्र पार्टी, संयुक्त सोशलिस्ट पार्टी आणि काँग्रेस (ओ) या पक्षांच्या २५७ आमदारांचा पाठिंबा होता. चौधरी चरण सिंह यांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. याचदरम्यान गुरू महंत अवैद्यनाथ यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यामुळे गोरखपूरमधील मानीराम मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्रिभुवन यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढविली. अनेक पक्षांचा पाठिंबा असल्याने निवडणुकीत विजय होईल, असा विश्वास त्यांना होता.

देशात याच काळात काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. त्रिभुवन नारायण सिंह हे इंदिरा गांधी यांच्या विरोधी गटात होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या गटानेही पोटनिवडणुकीत राम कृष्ण द्विवेदी यांना मैदानात उतरविले. त्यांच्यासाठी त्यांनी प्रचारही केला. या प्रचारामुळे सिंह यांना मोठा धक्का बसला होता.

निवडणुकीत त्यांचा १५ हजार मतांनी पराभव झाला. मुख्यमंत्री पोटनिवडणुकीत पराभूत झाल्याची ही पहिलीच घटना होती. या निकालानंतर विधानसभेत सिंह यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. ते १८ ऑक्टोबर १९७० ते ३ मार्च १९७१ या कालावधीत उत्तर प्रदेशचे सहावे मुख्यमंत्री होते.

Tribhuvan Narayan Singh
Ashwini Bhide News : अश्विनी भिडेंचा पगार रोखताच प्रशासनाला खडबडून जाग; वर्षभरात जे काम करता आलं नाही, ते काही तासांत झालं...

त्रिभुवन नारायण सिंह हे मुळचे वाराणसीचे. उच्च शिक्षण पूर्ण जाल्यानंतर त्यांनी काही काळ पत्रकार म्हणून काम केले. तसेच वाराणसीतील महात्मा गांधी काशी विद्यापीठात ते काही काळ अर्थशास्त्राचे प्राध्यापकही होते. स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी अनेक वर्षे सक्रीय सहभाग घेतला होता. त्यातूनच ते काँग्रेसशी जोडले गेले आणि १९५२ व १९५७ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकत संसदेत दाखल झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.