Sangli jillha Bank election sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Bank Election : भाजपविरोधासाठी काँग्रेसकडे अध्यक्षपद देण्याच्या हालचाली, सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नातलगांना गळ!

Jayant Patil Vishal Patil Vishwajeet Kadam : जिल्हा बँकेत भाजपला रोखण्यासाठी आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी काँग्रेसला महत्त्वाची पदे देण्याची हालचाली करत असल्याची चर्चा आहे.

Rahul Gadkar

Sangli Politics : सांगली जिल्ह्याचे आर्थिक आणि राजकीय सत्ता केंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आता अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. अशातच महाविकास आघाडीतील नेते, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडून त्याला तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची नोट आणि त्याला मिळालेली महायुतीतील घटक पक्षांमधील मिळालेली अंतर्गत ताकद याचाच फॉर्मुला जिल्हा बँकेच्या राजकारणात अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेत भाजपला रोखण्यासाठी आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी काँग्रेसला महत्त्वाची पदे देण्याची हालचाली सुरू केल्या आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी विविध नेत्यांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवाय महायुतीमध्ये घटक पक्षातील नाराजांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी थेट आमदार जयंत पाटील यांना टार्गेटवर ठेवले आहे. तर, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जयंत पाटील यांच्याकडून अनेक धक्कादायक निर्णय घेण्याची तयारी ठेवली जात आहे.

काँग्रेसला बँकेचे अध्यक्षपद देण्याच्या पर्यायावर महाविकास आघाडीत चर्चा सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील हे नेमके महाविकास आघाडी सोबत राहणार की भाजपसोबत जाणार याची चर्चा अधिक होती. त्याबाबतचे अनेक दावे प्रतिदावे जिल्ह्यातील इतर नेत्यांनी माध्यमांसमोर केले होते. अखेर कदम आणि खासदार पाटील हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच थांबणार असल्याचे सांगितले जाते.

भाजपकडूनही चाचपणी

महाविकास आघाडीची एकजूट कायम दाखवत भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला अध्यक्षपद देण्याच्या बोलीवर समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. आमदार विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेसमधील अन्य नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत. पालकमंत्री पाटील यांनी बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केल्याने जयंत पाटील यांच्या संपर्कात काँग्रेस नेते गेल्याने भाजपकडूनही नव्या समीकरणांची चाचपणी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT