Vishwajeet kadam. Vishal Patil, Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Bank Electon : सांगली जिल्हा परिषदेचा पॅटर्न जिल्हा बँक निवडणुकीत; महाविकास आघाडीची रणनीती ठरली! जयंत पाटील, विश्वजीत कदम, विशाल पाटलांची बैठक

Jayant Patil Vishwajeet Kadam Vishal Patil : जिल्हा बँक निवडणुकीची तयारी महाविकास आघाडीकडून करण्यात येत असून जयंत पाटील, विश्वजीत कदम, विशाल पाटलांच्या बैठकीत रणनीती निश्चित करण्यात आली आहे.

Rahul Gadkar

MVA Strategy : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मागील सत्ताधाऱ्यांवर भाजपकडून नोकरभरती, कार्यपद्धतीवर आक्षेप घेतल्याने महाविकास आघाडीकडून आता ताकही फुंकून पिले जात आहे.अशातच या निवडणुकीचा प्रचार आता तापणार असून सांगलीतील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेत रणनीती आखली आहे.

पक्षाच्या प्रमुख नेत्यांची रविवारी सांगलीत बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीची प्राथमिक रणनीती निश्चित करण्याबरोबरच जागावाटपावरही चर्चा केली आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची नुकतीच बैठक पार पडली.त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये महायुतीला पराभूत केले तसे जिल्हा बँकेतही पराभूत करण्याची रणनीती असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम आणि जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत देखील उपस्थित होते.

या बैठकीत महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचे धोरण निश्चित करण्यात आले, शिवाय महाविकास आघाडी मधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील अंतर्गत नाराज असणाऱ्यांची जवळीक साधण्याची चर्चा देखील करण्यात आली.

जत, आटपाडी, खानापूर आणि मिरज तालुक्यांतील उमेदवारीबाबत विशेष चर्चा झाल्याचे समजते.कारण आमदार गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबर यांचे शक्तीस्थळावर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण ठेवले आहे.

येत्या आठवडाभरातील महायुती मधील इच्छुक नेते घेण्याचे रणनीती आखली असून त्या संदर्भात पुढील आठवड्यात चर्चा करण्यात येणार आहे. शिवाय अशा नाराजांना सोबत घेऊन त्यांच्या सोबत चर्चा करण्याची देखील भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठेवली आहे.

मतदार यादी अंतिम होणार

महाविकास आघाडीतील इच्छुक व महायुती मधील संपर्कात आलेले इच्छुक यांच्याशी ताळमेळ साधूनच अंतिम जागावाटपावर निर्णय घेतला जाण्याची चर्चा यावेळी करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी १८ सप्टेंबरला अंतिम होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT