DCC Bank Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला धक्का; काँग्रेससोबतची आघाडी फायनल : आजी-माजी मंत्र्यांच्या बैठकीत सगळा प्लॅन ठरला!

DCC Bank Election : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची प्राथमिक बैठक झाली.
Yavatmal DCC Bank Election | Congress Shiv Sena Alliance Talks
Yavatmal DCC Bank Election | Congress Shiv Sena Alliance TalksSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal DCC Bank : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची शुक्रवारी (ता.४) विश्रामगृह येथे प्राथमिक बैठक झाली. निवडणुकीत संभाव्य आघाडी करण्यासह तालुका आणि जिल्हा गटातील जागांच्या वाटपाबाबत या बैठकीत प्राथमिक स्वरूपात चर्चा झाल्याची माहिती आहे.

निवडणूक कार्यक्रम सोमवारी (ता.७) जाहीर होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवरच राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जिल्ह्यातील सहकार क्षेत्राबरोबरच राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवार आणि राजकीय नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना-काँग्रेसच्या बैठकीत पहिल्या टप्प्यात दोन्ही पक्षांची ताकद आणि संभाव्य जागावाटप याबाबत चर्चा करण्यात आली. तालुका गट तसेच जिल्हा गटातील कोणत्या जागा कोणत्या पक्षाने लढवाव्यात, यावर नेत्यांनी आपापली भूमिका मांडल्याचे समजते. मात्र, अद्याप कोणत्याही जागेवर अंतिम निर्णय झालेला नसून, ही चर्चा प्राथमिक स्वरूपाची असल्याचे सांगण्यात येत आहे.

Yavatmal DCC Bank Election | Congress Shiv Sena Alliance Talks
Ahilyanagar DCC Bank Election : महायुतीतच कुरघोड्या; अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीआधी संघर्षाची ठिणगी

स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, सहकार क्षेत्रातील प्रभाव आणि संबंधित गटांमधील उमेदवारांची ताकद यांचा विचार करून जागावाटप निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील बैठकींमध्ये काही जागांबाबत तडजोडीचे सूत्र पुढे येण्याची शक्यता आहे. बैठकीला शिवसेनेकडून पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख, विदर्भ समन्वयक पराग पिंगळे उपस्थित होते. काँग्रेसकडून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी अध्यक्ष मनीष पाटील आणि अॅड. प्रफुल्ल मानकर यांनी सहभाग घेतला. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेमुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Yavatmal DCC Bank Election | Congress Shiv Sena Alliance Talks
PDCC Bank : अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा बँकेची पहिलीच निवडणूक : अधिकाऱ्यांचे आदेश धडकताच गुप्त हालचालींना सुरुवात

कार्यक्रम जाहीर होताच चित्र स्पष्ट होणार

जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी (ता. ७) जाहीर होण्याची शक्यता आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज, छाननी आणि माघारीची प्रक्रिया सुरू होणार असल्याने राजकीय पक्षांकडे निर्णय घेण्यासाठी मर्यादित कालावधी राहणार आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत बैठकींच्या फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com