Sangli Lok Sabha News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Lok Sabha News : विशाल पाटील पक्षातून बडतर्फ होणार? काँग्रेसने बोलवली बैठक...

Chetan Zadpe

Akola News : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करून सांगली लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीसाठी त्यांना 'लिफाफा' हे चिन्ह मिळाले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर सोशल मीडियावर विशाल पाटलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ते सांगलीला बंडाची परंपरा असल्याचे सांगून गड राखण्यासाठी मेहनत घेण्यास पाटलांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. यामुळे पक्षविरोधी कारवाईमुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली आहे.

काँग्रेस पक्षाने आणि नेत्यांनी समजावून सांगितल्यानतरही सांगलीत बंडाचं निशाण फडकवणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून कारवाईचा बडगा उचलला जाऊ शकतो. काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार केला जात आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. यामुळे लवकरच विशाल पाटीलांवर काँग्रेस कारवाईचं पाऊल उचलणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाना पटोले म्हणाले, "विशाल पाटील यांची समजून काढण्यासाठी, त्यांची मनधरणी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना उमेदवारी मागे घेण्यास मी स्वत: सांगितले. पक्षाकडूनही त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना कुणीतरी फूस लावल्याचे मला वाटत आहे."

"विशाल पाटलांवर यांच्यावर काय कारवाई करावी, या संदर्भात काँग्रेस पक्षाकडून येत्या 25 एप्रिल रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जे काही ठरेल त्यांनतर विशाल पाटील यांच्यावरच्या कारवाईबाबतचे स्वरूप स्पष्ट होईल," अकोल्यातील प्रचार सभेनंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी ही माहिती दिली आहे.

सांगलीत तिरंगी लढत -

विशाल पाटलांच्या बंडामुळे महाविकास आघाडीत (MVA) नाराजीचे वातावरण आहे. या बंडखोरीमुळे भाजपच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना विशाल पाटील माघार घेतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. आता सांगलीतून आघाडीचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) , महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT