Loksabha Election 2024 : नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांना डिवचलं; म्हणाले, त्यांची अंडे पिल्ले बाहेर काढू...

Nana Patole : नांदेडमध्ये राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. या प्रचारात अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्यात शीतयुद्ध रंगले आहे.
Ashok Chavan, Nana Patole
Ashok Chavan, Nana Patolesarkarnama

Nanded Loksabha News : नांदेड लोकसभेच्या प्रचारात अशोक चव्हाण आणि नाना पटोलेत आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. नाना पाटोले यांनी अशोक चव्हाणांवर टीकेची झोड उठवली आहे. पटोले म्हणाले, सत्तेचा फायदा स्वतःसाठी करणारे अशोक चव्हाण यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. ज्या काँग्रेसमध्ये राहिले त्याच काँग्रेसमधील लोकांना हरवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांनी काँग्रेसबद्दल बोलू नये त्यांचे अंडे पिल्ले काढण्याचे औषध माझ्याकडे आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नांदेडमध्ये राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. या प्रचारात अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्यात शीतयुद्ध रंगले आहे. नाना पाटोलेंवर आरोप करताना अशोक चव्हाण म्हणाले की, मंत्रिपदासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं. त्यावरून नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले आहे.

बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून त्यांचाकडे नोटा छापायची मशीन होती. ती बंद पडली त्याचा त्रास अशोक चव्हाण यांना होत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. सत्तेचा फायदा स्वतःसाठी करणारे अशोक चव्हाण यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. ज्या काँग्रेसमध्ये राहिले त्याच काँग्रेसमधील लोकांना पाडण्याची व्यवस्था त्यांनी केली होती, असा टोला पटोले यांनी लगावला.

Ashok Chavan, Nana Patole
Nanded Loksabha : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का बसणार? अमित देशमुखांच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा

त्यांनी काँग्रेसबद्दल बोलू नये. त्यांचे अंडे, पिल्ले काढण्याचे औषध माझ्याकडे आहे. त्यांच्याच पक्षातील आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत अशोक चव्हाण यांचा चिट्टा वाचून दाखवला होता. त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे आहे. कमिशन कसं खातात मला माहीत असल्याचे नाना पटोले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांनी राज्यात काय काय पाप केले याची मोठी जंत्री माझ्याकडे आहे. ज्या पक्षात राहतात तिथे गड्डा करतात. भाजपत काय गड्डा केला हे निकालानंतर तुम्हाला पाहायला मिळेल, असेही नाना पटोले म्हणाले. दरम्यान, सांगलीतील बंडखोरीबाबत विचारले असता, याबाबत येत्या 25 तारखेला तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

Edited By : Umesh Bambare

R

Ashok Chavan, Nana Patole
Ashok Chavan News : ज्या पक्षाने मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवलं त्याच अशोक चव्हाणांनी काँग्रेसला धुतलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com